कोरोना सेंटरमधील रुग्णांची चंद्र प्रकाशात अंगतपंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:39+5:302021-05-29T04:25:39+5:30
शिरूर कासार : येथील मानुरकर इंग्लिश स्कूलमध्ये आमदार सुरेश धस यांनी मोफत सेंटर सुरू केले आहे. यात आपलाही खारीचा ...
शिरूर कासार : येथील मानुरकर इंग्लिश स्कूलमध्ये आमदार सुरेश धस यांनी मोफत सेंटर सुरू केले आहे. यात आपलाही खारीचा वाटा म्हणून बागवान बंधुंनी रुग्णांना भोजन दिले. यावेळी रुग्णांनी चंद्र प्रकाशात गोलाकार बसून अंगत-पंगतीने या भोजनाचा आस्वाद घेतला.
तालुक्यात शासकीय कोविड सेंटरशिवाय मोफत सुविधा पुरवणारे सेंटरदेखील सुरू आहेत. गुरुवारी रात्री समिर व जमिर या बागवान बंधुंनी कोविड सेंटरवर भोजनाचे यजमानपद स्वीकारले होते. त्यांनी येथील रुग्णांना उत्तम प्रतिचे भोजन दिले. यावेळी रुग्णांनी गोलाकार बसून उत्साहात भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी मात्र अनेकांना आपण कोरोनाबाधित रुग्ण आहोत, याचा विसर पडला होता. या अंगत-पंगतने अनेकांच्या मनात लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला.
याप्रसंगी माजी नगरसेवक आनंद जावळे, नजिर शेख, डॉ.अजिंक्य गव्हाड, वार्डबाॅय राहुल बनकर, नितीन घुले, रेवन बोरगे, लोणके सिस्टर यांनीही भोजनाचा आस्वाद घेतला. कोविड सेंटरवर चोवीस तास दादा हरिदास हे सेवा देत असून, रुग्णांना धीर देण्याचे काम करीत आहेत.
===Photopath===
280521\vijaykumar gadekar_img-20210527-wa0063_14.jpg
===Caption===
शिरुर कासार येथील मानूरकर इंग्लीश स्कूलमधील मोफत कोरोना सेंटरमधील रुग्ण चंद्र प्रकाशात भोजनाचा आस्वाद घेताना.