मोंढा रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:22 AM2021-06-30T04:22:07+5:302021-06-30T04:22:07+5:30
बीड : शहरातील जालना रोडकडून मोंढा, एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. ...
बीड : शहरातील जालना रोडकडून मोंढा, एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. तब्बल एक वर्षांपासून या रस्त्याची दुर्दशा असून दुरुस्तीकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. परिणामी, खड्ड्यांचा आकार वाढत गेला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
-----------
पावसाचा परिणाम, भाज्या कडाडल्या
बीड : मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे शहरातील मंडईत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली. त्यामुळे एरव्ही स्वस्त विकल्या जाणाऱ्या पालेभाज्यांचेही भाव कडाडले आहेत. फळ भाज्यादेखील ६० ते ८० रुपये किलोपर्यंत विकल्या जात आहेत.
-----------
सहयोगनगर भागात पथदिवे बंद
बीड : शहरातील सहयोगनगर तसेच डीपी रोडवरील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. जालना रोड ते सुभाष रोडला जोडला जाणारा कमी अंतराचा रस्ता या भागातून जातो, त्यामुळे वाहतुकीची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे.