सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:39 AM2021-02-17T04:39:33+5:302021-02-17T04:39:33+5:30
वडवणी : शहरातील बाजारतळ परिसरात नगरपंचायतने व्यापारी व्यावसायिकांसह नागरिकांसाठी १४ व्या वित्त आयोगातून सन २०१६-१७ अंतर्गत सार्वजनिक शौचालय उभारले. ...
वडवणी : शहरातील बाजारतळ परिसरात नगरपंचायतने व्यापारी व्यावसायिकांसह नागरिकांसाठी १४ व्या वित्त आयोगातून सन २०१६-१७ अंतर्गत सार्वजनिक शौचालय उभारले. मात्र स्वच्छतेअभावी परिसरात दुर्गंधी पसरली असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तातडीने उपाययोजना करून दुर्गंधीचा बंदोबस्त करून शौचालय स्वच्छतेची मागणी व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी केली आहे.
शहरात उघड्यावर शौचास बसणे किंवा लघुशंका करणे हा कायद्यानुसार गुन्हा ठरवला जातो. सार्वजनिक शौचालय उभारणी केली जात आहे. मात्र नगरपंचायतच्या वतीने उभारणी केलेल्या शौचालयाची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तातडीने शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्याची मागणी होत असताना नगरपंचायत प्रशासन याकडे डोळेझाक करताना दिसत आहे. याबाबत नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील म्हणाले,सार्वजनिक शौचालयांची तत्काळ स्वच्छता केली जाईल.