पाच महिन्यांनंतर परळीतून वीजनिर्मिती; तीन संचांतून ६०० मेगावॅट विजेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 06:11 PM2020-09-11T18:11:36+5:302020-09-11T18:14:05+5:30

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून विजेची मागणी नसल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद होते. 

Power generation from Parli after five months; Generation of 600 MW power from three sets | पाच महिन्यांनंतर परळीतून वीजनिर्मिती; तीन संचांतून ६०० मेगावॅट विजेची निर्मिती

पाच महिन्यांनंतर परळीतून वीजनिर्मिती; तीन संचांतून ६०० मेगावॅट विजेची निर्मिती

Next
ठळक मुद्देतिन्ही संचांची स्थापित क्षमता ७५० मेगावॅट  ६, ७ आणि ८ हे संच सुरू करण्यात आले. 

परळी (जि. बीड) : मराठवाड्यातील एकमेव नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे बंद तीन संच तब्बल पाच महिन्यांनंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा कार्यान्वित झाले आहेत. 

राज्यात वीजेची मागणी वाढल्याने नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच सुरू केल्याने राज्यातील वीज निर्मितीत वाढ झाली आहे. एकूण ७५० मेगावॅट क्षमतेच्या येथील थर्मल मधील तीन संचातून गुरु वारी दुपारी ६०० मेगावॅट वीजेची निर्मिती सुरु होती.  दाऊतपुर -दादाहरी वडगाव शिवारात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे २५० मेगावॅट क्षमतेचे संच  क्र मांक ६, संच क्र मांक ७ व संच क्र मांक ८ हे तीन संच आहेत. 

गेल्या पाच महिन्यात वीजनिर्मिती येथील संचातून झाली नाही. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे तिन्ही संच सुरु  करण्यात आले आहे. अगोदर संच क्रमांक ८ हा सुरू करण्यात आला त्यानंतर ६ व ७ क्रमांकाचे दोन संच सुरू करण्यात आले. 


तिन्ही संचांची स्थापित क्षमता ७५० मेगावॅट 
या तीन संचांची एकूण स्थापित क्षमता ७५० मेगावॅट आहे. गुरुवारी दुपारी तीन संचांतून ६०० मेगावॅट एवढी वीजनिर्मिती सुरु होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे राज्यातील उद्योगधंदे बंद होते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून विजेची मागणी नसल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद होते. 
 

Web Title: Power generation from Parli after five months; Generation of 600 MW power from three sets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.