या परीक्षेत एकूण १८०० विद्यार्थांनी सहभाग नोंदविला आणि १२०० विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. बी. एस्सी. प्रथम, द्वितीय, तृतीय वर्गामधून राज्यातून एकूण २३ विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी महाविद्यालयात विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केले होते. साधनव्यक्ती म्हणून गोवा विद्यापीठाचे प्रो. शेषनाथ भोसले यांना आमंत्रित करण्यात आले होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत सानप हे होते.
मूलभूत विज्ञान विषयात आजच्या परिस्थितीत जगात उपलब्ध असलेल्या संशोधन संधी यावर त्यांनी मार्गदर्शन केले. विशेषतः मिमिकिंग नैसर्गिक फेनोमेनोन या विषयावर त्यांनी भाष्य केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. वसंत सानप यांनी वैज्ञानिक स्वभाव आणि आजचे विद्यार्थी यावर संवाद साधला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विज्ञान विभागाचे प्राध्यापक, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.