बीड लोकसभा मतदार संघात १८ एप्रिल रोजी मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:27 AM2019-04-04T00:27:25+5:302019-04-04T00:27:58+5:30

भारत निवडणूक आयोगाने दिनांक १० मार्च, २०१९ च्या प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ चा कार्यक्रम घोषित केला आहे.

Public holiday for voting on April 18 in Beed Lok Sabha constituency | बीड लोकसभा मतदार संघात १८ एप्रिल रोजी मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर

बीड लोकसभा मतदार संघात १८ एप्रिल रोजी मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर

Next

बीड : भारत निवडणूक आयोगाने दिनांक १० मार्च, २०१९ च्या प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ चा कार्यक्रम घोषित केला आहे.
ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे, त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे यासाठी त्या लोकसभा मतदारसंघामध्ये परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१) चा २६ कलम २५ खाली सार्वजनिक सुटी जाहीर करणे आवश्यक आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार ३९-लोकसभा मतदारसंघात गुरुवार, दि. १८ एप्रिल २०१९ रोजी मतदानाच्या दिवशी बीड लोकसभा मतदार संघात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येत आहे.
ही सार्वजनिक सुटी बीड लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील मतदान कामासाठी त्या-त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. त्याचबरोबर राज्य व केंद्र शासनाच्या कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठानांनाही लागू राहील, असे अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
आपले कर्तव्य बजवावे
मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्टÑीय कर्तव्य आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

Web Title: Public holiday for voting on April 18 in Beed Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.