बीड : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे प्रश्न कर्मचारी कल्याण अभियानांतर्गत सुट्टीतील एक महिन्याच्या कालावधीत निकाली काढले जातील, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिली. सोमवारी विविध मागण्यांसंदर्भात सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.या बैठकीत प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये शिजवावयाचा शालेय पोषण आहार व त्यामध्ये येणाºया अडचणी संघटना पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. सुटीच्या कालावधीत शालेय पोषण आहार शिजवून देण्याची योजना बंद करून तांदूळ विद्यार्थ्यांना वाटप करण्याची परवानगी मिळावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेले शिक्षक चंद्रकांत हिरवे व मोहमंद इर्शाद यांच्या कुटुंबियांना शासनाने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, हा मुद्दाही प्रकर्षाने मांडण्यात आला.यावेळी सुटीतील शालेय पोषण आहार योजनेसाठी लाभार्थी उपस्थित राहत नसतील तर त्याची जबाबदारी शिक्षकांवर असणार नाही, तशी नोंद ठेवणे आवश्यक असेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले. या बैठकीस बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मागण्यांचा पाठपुरावाशिक्षकांचे ६ व्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते जीपीएफमध्ये जमा करावेत. थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा. चटोपाध्याय व निवडश्रेणीचे प्रस्ताव तसेच जीपीएफ प्रस्ताव निकाली काढावेत. शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमपी योजना कार्यान्वित करावी. नियमबाह्य पदोन्नत्या रद्द कराव्यात.गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार वर्ग -२ च्या अधिकाºयांनाच द्यावा,एक लाख रुपयांच्या आतील वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके जिल्हा शल्य चिकित्सकांकडे न पाठवता जिल्हा आरोग्य अधिकाºयांमार्फतच मंजूर करावेत, २० च्या आत पटसंख्या असलेल्या शाळा बंद करु नयेत, बदल्यांपूर्वी समायोजन व पदोन्नत्या कराव्यात. सेवानिवृत्त कर्मचाºयांसाठी सातवा वेतन आयोग वेतननिश्चतीची स्वतंत्र व्यवस्था करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
शिक्षकांचे प्रश्न महिनाभरात निकाली काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 12:16 AM
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे प्रश्न कर्मचारी कल्याण अभियानांतर्गत सुट्टीतील एक महिन्याच्या कालावधीत निकाली काढले जातील, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
ठळक मुद्देसीईओंची ग्वाही : शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा; ५ मे रोजी दिले निवेदन