बीड : जुगार अड्ड्यावर छापा टाकत २१ जुगाऱ्यांसह अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने आंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील बाळेवाडी शिवारात सोमवारी दुपारी केली. या प्रकरणी आंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळेवाडी शिवारात साखराबाई काकडे यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरू होता. याची माहिती विशेष पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली. सोमवारी दुपारी विशेष पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी तेथे तिरट नावाचा जुगार खेळताना २१ जुगारी मिळून आले. यामध्ये शिवाजी विश्वनाथ गर्जे (रा.खिळद, ता.आष्टी), संजय पोपट वालेकर (रा.देवीगव्हाण, ता.आष्टी), यशवंत कोंडीबा खंडागळे, हनुमंत सीताराम बुद्धिवंत, नवनाथ दशरथ रोडे (रा.शिराळा), ज्ञानदेव दौलत गांगर्डे (रा.निमगाव गांगर्डा, ता.कर्जत), बाळासाहेब अजुर्न राळेभात (रा.जामखेड), राजेंद्र हिरालाल शेळके, बंडू बाबासाहेब वायबसे, दिनकर साहेबराव नागरगोजे, गणेश विठ्ठल दिघे, चंद्रभान आश्रुबा लोखंडे, लहु शांताराम माने, सुधाकर सुभाष तारू, विकास उत्तम मस्के, सोनू बापू औटे, राजू सायबा उमरे, सुभाष रामा फुलमाळी, केशव शिवाजी उदावंत, बाळासाहेब नारायण बंडाळे, शिवाजी रामभाऊ काळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख सपोनि विलास हजारे यांच्या पथकाने केली.
दुचाकी, मोबाइल, चारचाकी जप्त
छापा टाकला त्यावेळी जुगाऱ्यांकडून मोबाइल, कार, दुचाकी व रोख रक्कम मिळून असा ११ लाख ५३ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.