या वेळी प्रा. युवराज मुळये म्हणाले, समाजाला स्वच्छता संदेश देणारे, विधायक दिशा देणारे, समाजात एकोप्यासाठी गावोगावी जाऊन समाज एकसूत्रतेमध्ये बांधण्याचे कार्य राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी केले. समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करणारे व राष्ट्र उभारणीचे सक्षमपणे कार्य करणारे थोर पुरुष राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे विचार- आचार आणि कर्तृत्व हे आपण नेहमी अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. समीर मुळी यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत अलझेंडे याने तर आभार सना अत्तार हिने मांडले. जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी परिसराची स्वच्छता केली.
स्वच्छतेचे पुजारी म्हणजेच राष्ट्रसंत गाडगेबाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:34 AM