लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत आता दुकानात रेशन विक्रेता उपलब्ध नसल्यास आणि शिधापत्रिकेवरील कुटुंबप्रमुख नसलातरी ई- पॉसद्वारे लाभार्थी कुटुंबाला धान्य मिळणार आहे. या साठी मात्र आधी दुकानांवर जाऊन आधार सिडींग व ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. बीड जिल्ह्यात इ-पॉस यंत्रात सुधारित सॉफ्टेवअरचे काम सुरु झाले आहे.
रेशन दुकानातून लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. या सुधारणा करुन ई- पॉस यंत्राच्या माध्यमातून धान्य वितरण करण्यात येत होते. मात्र अनेकदा दुकानांवर रेशन विक्रेता उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना हेलपाटा मारावा लागत होता. तसेच काही वेळा शिधापत्रिकेवरील कुटुंबप्रमुखाऐवजी त्याच्या कुटुंबातील सदस्य धान्य आणण्यासाठी गेल्यास त्याला धान्य मिळण्यात अडचणी होत्या. त्यामुळेही त्यांचा हेलपाटा होत असे. मात्र आता आधार इनेबल पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमअंतर्गत धान्य वितरण करण्याबाबत राज्याच्या पुरवठा विभागाने सूचना केल्या आहेत. त्यानुसार ई- पॉस यंत्र अपडेट करण्याचे काम सुरु आहे.
आधी रेशन विके्रत्याचा आयडी व पासवर्ड नोंदताच ई- पॉस यंत्र सुरु होत होते. मात्र यात सुधारणा केली असून रेशन विक्रेता तसेच त्याचे दोन नॉमिनी यांची नोंद यंत्रामध्ये घेतली जात आहे. त्यामुळे रेशन विक्रेता नसलातरी पर्यायी नॉमिनी हे यंत्र सुरु करुन शिधापत्रिका धारकाचा आधार व अंगठ्याचा ठसा घेऊन धान्य वितरित करु शकतील. मात्र कुटुंब प्रमुखालाच यावे लागत होते.
आता या प्रणालीत सुधारणा करण्यात येत आहे. संबंधित रेशन दुकानात जावून शिधापत्रिकेवर नोंदीत कुटुंब सदस्यांना ई केवायसी प्रक्रिया त्याचा आधार क्रमांक नोंदवून पूर्ण करता येणार आहे. तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी तहसीलमध्ये न जाता गावातील दुकानातच आधार सिडींग करता येणार आहे. यासाठी संबंधिताचा आधार क्रमांक व अंगठ्याचा ठसा नोंदवावा लागेल. जर दुरुस्ती करावयाची असेल तर संबंधितांना मात्र तहासील कार्यालयातच जावे लागणार आहे.आधार असेल तरच धान्य व पावतीईपीडीएस अंतर्गत आतापर्यंत ई- पॉसद्वारे धान्य वाटप करण्यात येत होते. आधार नसलातरी पावती निघत होती. यापुढे मात्र आधार व ठसे असेलतर पावती निघणार व धान्य मिळणार आहे.
५ लाख ३० हजार ८०० लाभार्थीजिल्ह्यात सर्व प्रकारचे लाभार्थी शिधापत्रिका धारक ६ लाख ६६ हजार असून, ५ लाख ३० हजार ८०० शिधापत्रिका धारक धान्य उचलतात, असे पुरवठा विभागाने सांगितले.
डाटा एन्ट्रीत बीड, परळी मागेबीड जिल्ह्यात शिधापत्रिका डाटा एन्ट्रीचे काम ६७ टक्के झाल्याचे सांगण्यात येते. ३५ प्रकारची माहिती यात नोंदविण्यात येत आहे. डाटा एन्ट्रीमध्ये आष्टी, गेवराई, केज तालुक्यांची आघाडी आहे. मात्र बीड आणि परळी तालुके अत्यंत मागे पिछाडीवर आहेत. उर्वरित २७ टक्के कामाची प्रक्रिया सुरु आहे.