बीड : भंडारा दुर्घटनेला अनुसरून जिल्ह्यातील सर्वच खाजगी रुग्णालयांना पत्र देऊन सुरक्षिततेचा अहवाल (फायर, इलेक्ट्रिक ऑडिट) सादर करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी दिल्या आहेत. याचा अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगितले असून जे करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा इशाराही दिला आहे, तर दुसऱ्या बाजूला शासकीय आरोग्य संस्थांचे ऑडिट अंतिम टप्प्यात आहे.
भंडार येथील शिशुगृहातील आगीच्या दुर्घटनेनंतर शासनाने सर्वच शासकीय आणि खाजगी रुग्णालयांचे ऑडिट करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच शासकीय आरोग्य संस्थांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट करण्यास सुरुवातही करण्यात आली. तसेच खाजगी रुग्णालयांनाही पत्र देण्यात आले. फायर, इलेक्ट्रिक ऑडिट करून तात्काळ अहवाल देण्याच्या सूचना डॉ. गित्ते यांनी दिल्या आहेत. आता या ऑडिटमध्ये काय त्रुटी निघतात, हे अहवाल आल्यानंतरच समोर येणार आहे.
७ खाजगी रुग्णालयांत एनआयसीयू
जिल्ह्यात ५४ बाल रुग्णालये आहेत. पैकी सात रुग्णालयांत एनआयसीयूची व्यवस्था असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. येथील फायर सुरक्षाबद्दल अद्याप काहीच माहिती आलेली नाही. ऑडिटनंतरच ते समोर येईल, असे सांगण्यात आले.
कोट - फोटो
शासकीय आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट पूर्ण झाले असून इलेक्ट्रिक ऑडिटही दोन दिवसांत पूर्ण होईल. जिल्ह्यात ५४ बाल रुग्णालये असून ७ ठिकाणी एनआयसीयूची सुविधा आहे.
-डॉ. सूर्यकांत गित्ते
जिल्हा शल्यचिकित्सक, बीड