सेवानिवृत्तीचे वय ५५ वर्षे करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:41+5:302021-05-29T04:25:41+5:30

बाजार समिती उघडण्याची मागणी आष्टी : तालुक्यात कांद्याचे माेठ्या प्रमाणात उत्पादन होते. सध्या शेतकरी उन्हाळी कांदा काढीत व्यस्त ...

Retirement age should be 55 years | सेवानिवृत्तीचे वय ५५ वर्षे करावे

सेवानिवृत्तीचे वय ५५ वर्षे करावे

googlenewsNext

बाजार समिती उघडण्याची मागणी

आष्टी : तालुक्यात कांद्याचे माेठ्या प्रमाणात उत्पादन होते. सध्या शेतकरी उन्हाळी कांदा काढीत व्यस्त आहे. कांदा साठवणुकीसाठी शेतकऱ्यांकडे कांदा चाळ नाहीत. पावसाळा तोंडावर आल्याने कांदा शेतातच भिजण्याची चिन्हे आहेत. बाजार समित्या बंद असल्याने कांदा विक्रीसाठी नेता येत नाही. तरी बाजार समित्या खुल्या कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

......

कांदा चाळीत टाकण्याची लगबग

कडा : कडा परिसरात शेतकरी उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतो. सध्या शेतकरी कांदा काढणीत व्यस्त आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. कांदा भिजण्याची शक्यता लक्षात घेऊन कांदा सुकवून कांदा चाळीत टाकण्याची लगबग सुरू आहे.

...

शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

बीड : शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागत पूर्ण केल्या आहेत. खरिपाच्या पेरणीच्या तयारीही जवळपास शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. रोहिणी नक्षत्र सुरू झाले आहे. गेल्या दोन दिवसात जिल्ह्याच्या अनेक भागात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. परंतु शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

....

फळझाडांच्या रोपांना मागणी वाढली

आष्टी : तालुक्यात शेतकरी पाणीटंचाई लक्षात घेता मोठ्या प्रमाणात फळबागांकडे वळला आहे. अनेकांनी फळबागांसाठी शेततळे उभे केले आहेत. तर अनेक शेतकरी संत्रा, मोसंबी, आंबा, सीताफळ, चंदन, पेरू झाडांच्या लागवड करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे या रोपांना मागणी वाढू लागली आहे.

....

जनावरांना लसीकरण करावे

बीड : पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर जनावरांंमध्ये लाळ्या खुरकुत, ताप, पोटाचे विकार यासारखे साथरोग होतात. यात अनेक जनावरे दगावतात. पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तरी पशुसंवर्धन विभागाने तातडीने जनावरांचे लसीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

....

Web Title: Retirement age should be 55 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.