टंचाई परिस्थितीसंदर्भात बीडमध्ये आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:42 AM2018-12-22T00:42:52+5:302018-12-22T00:43:39+5:30
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी संबंधीत विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी संबंधीत विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली. सर्व तहसीलदार, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी योग्य नियोजन करून टंचाईनिवारणासंदर्भात विविध कामे करण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
जिल्ह्यातील पाणी व चारा टंचाई तसेच मजूरांच्या हाताला काम देण्यासंदर्भात अनेक वेळा नागरिकांनी मागणी केली होती. त्या संदर्भात जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना सूचना करीत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील पशु संख्या, लागणारा चारा व गाळपेºयांतून उपलब्ध होणारा चारा संदर्भांतील सर्व माहिती मागविण्यात आली आहे. रोहयोंतर्गंत कामासंदर्भात जिल्हाधिका-यांनी असमाधानता व्यक्त केली असून योग्य नियोजन करुन कामे सुरु करावे तसेच रोहयोच्या माध्यमातून सर्व पं.स.तील गटविकास अधिकाºयांनी विहिरींची कामे व इतर जलसंधारणाची कामे सुरु करण्याचा सूचना दिल्या.
निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व विभागातील अधिकाºयांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅड मशीन व इतर नियोजन कसे करावे यासंदर्भांत प्रशिक्षण घेण्यात आले. कोणत्या विभागाच्या किती अधिकाºयांनी प्रशिक्षण घेतले आहे याचा आढावा देखील घेण्यात आला. तसेच उर्वरित अधिकाºयांना देखील प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती आहे. आरडीसी चंद्राकांत सूर्यवंशी, निवडणूक विभागाचे उप जिल्हाधिकारी प्रवीणकुमार धरमकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिल भोकरे, पशुसंर्वधन अधिकारी डॉ. संतोष पालवे आदी उपस्थित होते.