रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:35 AM2021-07-30T04:35:33+5:302021-07-30T04:35:33+5:30
बेरोजगारांची अडवणूक थांबवावी अंबाजोगाई : युवक व युवतींना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी व संलग्न व्यवसाय, लघु उद्योग, वाहतूक क्षेत्राशी संबंधित ...
बेरोजगारांची अडवणूक थांबवावी
अंबाजोगाई : युवक व युवतींना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी व संलग्न व्यवसाय, लघु उद्योग, वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय व पारंपरिक व्यवसायांसाठी कर्ज देण्याचा नियम आहे. पण राष्ट्रीयीकृत बँकांकडून अडवणूक केल्याचा आरोप बेरोजगारांनी केला आहे. या बेरोजगारांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे, अशी मागणी नगरसेवक संतोष शिनगारे यांनी केली आहे.
योजनांची माहिती नागरिकांना द्या
अंबाजोगाई : शासनाकडून सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांची माहितीच अनेकांपर्यंत पोहोचली नसल्याने नागरिक योजनांपासून वंचित आहेत. योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
जड वाहतूक बंद करावी
अंबाजोगाई : सायगांव नाका ते सावरकर चौक या मुख्य मार्गावर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत या रस्त्यावरून होणारी जड वाहतूक बंद करावी. या रस्त्यावरून एखादे मोठे वाहन गेले तरी खूप वेळ वाहतूक ठप्प होते. या रस्त्यावर दवाखाने, बँकासुद्धा आहेत. त्यामुळे याठिकाणी बरेचदा वाहतुकीची कोंडी होते. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन येथील जडवाहतूक बंद करावी. अशी मागणी अशोक कचरे यांच्यावतीने करण्यात आली आहे.
अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री
अंबाजोगाई : शहरात अस्वच्छतेच्या वातावरणात अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न निरीक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अपुऱ्या अधिकाऱ्यांमुळे खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांची तपासणी करताना तारांबळ उडत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.