बीड : टांबी, दोर असे साहित्य घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सापळा रचून बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई बुधवारी दुपारी माजलगाव शहरात स्थानिक गुन्हे शाखेने केली.सूरज दिनेश जावळे (२०, रा. खडकी देवळा ता. वडवणी), शुभम हरी साबळे (१९, रा. एकुरका ता. औसा जि. लातूर) व रोहन उर्फ जिजा राणुजी शिंदे (१९, रा. भीमनगर, माजलगाव) अशी त्या आरोपींची नावे आहेत. माजलगावात सलग दोन दिवस दिवस घरफोडीच्या घटना घडल्या होत्या.त्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली आणि तपासाला गती दिली. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक दिलीप तेजनकर यांना माजलगाव शहरात काही दरोडेखोर आले असून ते दिवसा दरोडा टाकणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या टिमसह शहरात सापळा लावला. यावेळी पोलिसांना पाहून तिघे पळताना दिसून आले. त्यामुळे संशय बळावला. पोलिसांनी पाठलाग करून या तिघांनाही बेड्या ठोकल्या. पोलिसी खाक्या दाखविताच ते पोपटासारखे बोलू लागले आणि आपल्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली. त्यांच्याकडून स्कू्र, पक्कड, ब्लेड, टांबी व इतर साहित्य जप्त केले आहे. तसेच पुण्यातून चोरी केलेल्या दोन दुचाकीही त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत. त्यांना माजलगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. पकडलेले तिघेही अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर पिंप्री चिंचवड, भोसरी, निगडी येथे घरफोडी, दुचाकीचोरी व खुनाचा प्रयत्न असे गुन्हे नोंद आहेत. त्यांच्याकडून माजलगाव परिसरातील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सपोनि दिलीप तेजनकर यांनी व्यक्त केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर अधीक्षक अजित बोºहाडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप तेजनकर, मुंजाबा कुव्हारे, सतीश कातखडे, गोविंद काळे, चालक भागवत बिक्कड यांनी कारवाई केली.
दरोडा टाकण्यापूर्वीच तिघांना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:21 AM
टांबी, दोर असे साहित्य घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सापळा रचून बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई बुधवारी दुपारी माजलगाव शहरात स्थानिक गुन्हे शाखेने केली.
ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : दोन दुचाकींसह दरोड्याचे साहित्य जप्त