बीड जिल्ह्यात सरपंचाच्या आईवर चोरट्यांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:07 AM2018-04-17T01:07:02+5:302018-04-17T01:07:02+5:30
धारुर तालुक्यातील कोळपिंप्री येथे रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सरपंच विजयकुमार खुळे यांच्या आई सुशीलाबाई खुळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. तसेच गावात अन्य एकाच्या घरी चोरी झाली. तर दुसऱ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. या चो-यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून ते दहशतीखाली आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिका-यांसह विशेष पथकांना पाचारण केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारुर : तालुक्यातील कोळपिंप्री येथे रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सरपंच विजयकुमार खुळे यांच्या आई सुशीलाबाई खुळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. तसेच गावात अन्य एकाच्या घरी चोरी झाली. तर दुसऱ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. या चोºयांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून ते दहशतीखाली आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांसह विशेष पथकांना पाचारण केले होते.
सरपंच विजयकुमार मुरलीधर खुळे यांच्या घरात शिरण्यापूर्वी त्यांनी इतर दरवाजांच्या बाहेरून कड्या लावल्या. चोरटे थेट सुशीलाबाई खुळे (वय ८०) यांच्या खोलीत शिरले. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात कशाने तरी मारहाण केली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. सकाळपर्यंत हे कोणाच्याही लक्षातही आले नाही. या खोलीतील एक पत्र्याची पेटी उचलून गावाच्या पश्चिमेस काही अंतरावर फेकून दिली. घरातील दीड ते दोन तोळे सोने लंपास केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अनिल देशपांडे यांच्या घरात प्रवेश करताच ते जागे झाले. चोरट्यांनी दाबदडप करून घरातील साहित्य, कपडे चोरुन नेले. तसेच बाबूराव खुळे यांचे गेटचे कुलूप तोडले, परंतु चोरीचा प्रयत्न फसला.
दरम्यान, चोरट्यांनी केलेल्या मारहानीत सुशीलाबाई खुळे या गंभीर जखमी झाल्या असून, डोक्याला खोलवर जखम झाली आहे. रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणावर झाल्याने अंबाजोगाई येथील स्वा. रा. ती. ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, पोलीस उपअधीक्षक मंदार नाईक, पोलीस निरीक्षक ए. एल. तेली यांनी भेटी दिल्या. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, श्वान पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी धारुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
३० वर्षानंतर गावात चोरी
कोळपिंपरीत मागील ३० वर्षांपासून चोरी झाली नव्हती. परंतु सोमवारी एकाच रात्री चोरट्यांनी गावात धुमाकूळ घालत दोन ठिकाणी चोºया केल्या तर एका ठिकाणी त्यांचा प्रयत्न फसला. तसेच चोरट्यांनी मारहाणही केल्यामुळे ग्रामस्थ दहशतीखाली आहेत.