मुरंबी येथे अनेक घरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:34 AM2021-03-10T04:34:00+5:302021-03-10T04:34:00+5:30
घाटनांदूर : येथून जवळच असलेल्या मुरंबी ता. अंबाजोगाई येथे ८ मार्च रोजी २ ते ३ वाजताच्या सुमारास किमान ६ ...
घाटनांदूर : येथून जवळच असलेल्या मुरंबी ता. अंबाजोगाई येथे ८ मार्च रोजी २ ते ३ वाजताच्या सुमारास किमान ६ ते ७ घरात चोरी करीत चोरांनी सोने, चांदीसह रोख लाखो रुपये लंपास करून पोबारा केला. या प्रकाराने खळबळ उडाली असून एकदाच ६-७ घरातून चोरीच्या प्रकारामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
मुरंबी येथील भरवस्तीत असलेल्या सत्यवान बाबासाहेब माने यांचे घर फोडत चोरट्यांनी तब्बल १३ तोळे सोन्याचे दागिने व रोख २ लाख रुपये व कपडे लंपास केले. भगवान व्यंकट जाधव यांच्या घरातील ३ तोळे सोन्याचे दागिने व १५ हजार रुपये तसेच अंतराम घोगरे यांच्या घरातून १.५ ग्रॅम सोने, चांदी, ८ ते १० साड्या घेऊन चोरांनी पोबारा केला. मधुकर दशरथ माने यांच्या घरातील बरेचसे साहित्य लंपास केले. दिलीप जाधव यांच्या घराचे गेटचे कुलूप तोडले. तसेच बलभीम माने यांच्याही घराचे कुलूप तोडले गेले आहे. ज्योतीराम कोकाटे एम एच १४ पी आर ५४८३ तर सर्जेराव जाधव यांची एम एच ४४ - ३९२० या दोन मोटारसायकली घेऊन चोरट्यांनी धूम ठोकली. मात्र त्या दोन्ही मोटारसायकली वाटेतच सोडून दिल्या.
मुरंबी येथे चोरट्यांनी कहर केला असून भरवस्तीत असलेल्या घरातून चोऱ्या तर झाल्याच सोने, चांदी, दागिने या बरोबरच लाखो रुपये नगदी सोबतच कपडे, किराणा साहित्यही चोरांनी भरून नेले आहे. घाटनांदूर व परिसरातील अनेक गावांतून बऱ्याच दिवसांपासून किरकोळ वगळता चोऱ्याचे सत्र बंद होते. मात्र काल मुरंबी येथे झालेल्या या जबरी दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले असून चोरटे पुन्हा सक्रिय झाले की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. या जबरी चोरीच्या प्रकरणाची बर्दापूर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते. चोरीच्या प्रकरणामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले असून अद्यापपर्यंत एवढी मोठी घटना होऊनही बर्दापूूूर पो.स्टे. वगळता एकाही वरिष्ठ अधिका-याने भेट दिली नाही, हे विशेष.
===Photopath===
090321\narshingh suryvanshi_img-20210309-wa0012_14.jpg
===Caption===
घाटनांदूर येथून जवळच असलेल्या मुरंबी (ता अंबाजोगाई ) येथे ८ मार्च रोजी २ ते ३ वाजेच्या सुमारास किमान सहा ते सात घरात चोरी करीत चोरांनी सोने, चांदीसह रोख लाखो रुपये लंपास करून पोबारा केला.