सोनोग्राफी यंत्र तीन महिन्यांपासून धूळ खात; गरोेदर महिलांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:43 PM2019-05-16T23:43:11+5:302019-05-16T23:44:29+5:30
येथील उपजिल्हा रु ग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सोनोग्राफी यंत्र उपलब्ध करु न दिलेले आहे. मात्र ते रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तीन महिन्यापासून धूळ खात पडून आहे.
गेवराई : येथील उपजिल्हा रु ग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सोनोग्राफी यंत्र उपलब्ध करु न दिलेले आहे. मात्र ते रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तीन महिन्यापासून धूळ खात पडून आहे. यामुळे रु ग्णांसह गरोदर महिलांचे मोठे हाल होत आहेत. तपासणीनंतर डॉक्टर सोनोग्राफी करण्यासाठी रु ग्णांच्या हातात चिठ्ठी देत आहेत. परिणामी रुग्ण, गरोदर माता तसेच प्रसुतीसाठी रु ग्णालयात दाखल झालेल्या महिलांना खासगी केंद्रातून सोनोग्राफी करावी लागत आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
गेवराई येथील उपजिल्हा रूग्णालयात गेवराईसह अंबड, माजलगाव, शिरुर तालुक्यातील काही रुग्ण येथे येत आहेत. यामुळे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी असते. दरमहा सात ते आठ हजार रु ग्ण येथे उपचारासाठी येतात.
तसेच प्रसुतीसाठी तालुक्यातून महिला मोठ्या प्रमाणात येतात. प्रसुतीपूर्व तपासण्याही कराव्या लागतात. शिवाय ५० खाटांचे रुग्णालय असल्याने दाखल करावयाच्या अनेक रुग्णांची सोनोग्राफी करावी लागते. यावेळी रुग्णालयात ही सोनोग्राफी मशीन असूनही तीन महिन्यांपासून धूळ खात पडलेली आहे.
याबाबत जिल्हा आरोग्य प्रशासनाने तातडीने पावले उचलून या ठिकाणी असलेली सोनोग्राफी मशीन सुरू करुन तालुक्यातील महिला रुग्णांचे होणार हाल थांबविण्याची मागणी होत आहे.