पाटोदा येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महेंद्र नागरगोजे व व उमर चाऊस यांनी गुरूवारी तहसीलदार यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे येथील व्यापाऱ्यांनी पालन केले आहे सर्व व्यापाऱ्यांनी अँटिजेंन टेस्ट करन घेतलेल्या आहेत, त्याप्रमाणेच मास्क , सामाजिक अंतर , सॅनिटायझरचा वापर यासह अन्य आदेश व्यापारी पाळत आहेत तरीही प्रशासनाने लॉकडाऊन लादला आहे. पाटोदा येथील सर्वच व्यापारी सक्षम नाहीत छोट्या व्यावसायिकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ् यांनी या सर्व बाबींचा विचार करूनलॉकडऊनबाबत फेरविचार करावा, अशी विनंती व्यापाऱ्यांनी केली आहे.
लॉकडाऊन रद्दसाठी पाटोद्यात व्यापाऱ्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:34 AM