वृक्षतोड थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:15+5:302021-04-03T04:30:15+5:30
काटेरी झुडपे वाढली, नागरिकांना त्रास बीड : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यानजीक काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यावर्षी मोठ्या ...
काटेरी झुडपे वाढली, नागरिकांना त्रास
बीड : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यानजीक काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यावर्षी मोठ्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साठलेले राहिल्याने परिसरात काटेरी झुडपांची मोठी वाढ झाली. आता ही झुडपे रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. अनेकांना या काटेरी झुडपामुळे इजाही झालेली आहे.
रस्ते खोदून ठेवल्याने वाहनांचे नुकसान
अंबाजोगाई : शहर व परिसरात तसेच ग्रामीण भागात रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. तसेच लहान मोठे मातीचे ढीग यामुळे एसटी बस व खासगी वाहने आदळून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अंबाजोगाई आगाराच्या बस आदळून खिळखिळ्या झाल्या आहेत. यासाठी या रस्त्याची दुरूस्ती लवकर करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.