शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

टाकरवण येथे गोधनासह शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:51 PM

दुष्काळात जनावरांना चारा छावणीऐवजी शेतकºयांना दावणीला चारा द्या, गाय, बैल, म्हैस व इतर पाळीव प्राण्यांना प्रती जनावर वीस हजार रु पये चारा अनुदान द्या, यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देभाकड जनावरे जगवायची कशी ?: आंदोलकांचा सवाल, २० हजार रु. अनुदानाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरवण : दुष्काळात जनावरांना चारा छावणीऐवजी शेतकºयांना दावणीला चारा द्या, गाय, बैल, म्हैस व इतर पाळीव प्राण्यांना प्रती जनावर वीस हजार रु पये चारा अनुदान द्या, यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले.माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे भगतसिंग चौकात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ बंडूराम गरड यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनातशेतकरी गोधन व बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. सरकारचा गोवंशाचा पुळका फसवा असल्याचा आरोप करून कॉ. गरड म्हणाले की, सरकारने गाय, बैल विकण्यास प्रतिबंध करणारा कायदा करून शेतकºयांचा भुर्दंड वाढवला आहे. त्यामुळे आता अनुत्पादक व भाकड जनावरे पोसावी लागत आहेत. दुष्काळात कामाच्या व दुभत्या जनावरांना सांभाळणे मुश्किल झाले असताना आता भाकड जनावरांचे करायचे काय हा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. सरकारने आता दुष्काळात प्रत्येक जनावरांना वीस हजार रु पये चारा अनुदान द्यावे व अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या खात्यात वर्ग करुन आपण गोवंशाचे रक्षक असल्याचे सिद्ध करावे, असे यावेळी आंदोलनकर्ते व शेतकºयांना मार्गदर्शन करताना कॉ. गरड म्हणाले.चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने चारा छावण्यांऐवजी शेतकºयांना थेट चारा अनुदान द्यावे, प्रत्येक जनावरामागे शेतकºयांना वीस हजार रु पये चारा भत्ता द्यावा, रोजगार हमीची कामे तात्काळ सुरु करु न या कामावर रोज किमान ६०० सहाशे रु पये वेतन द्यावे, शेतातील पिके नष्ट झाल्याने शेतकºयाला प्रतीहेक्टरी पन्नास हजार रु पये नुकसान भरपाई द्यावी, थकित पिक विम्याची रक्कम शेतकºयांना तात्काळ वाटप करावी, गरीब शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, सर्व शेतमजूर व शेतकºयांची नावे अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून त्यांना प्रतीमाह ३५ किलो धान्य २ रु पये किलो दराने वाटप करावे, शेतकºयांचे वीज बिल माफ करावे, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फीस माफ करावी, कापसाला प्रति क्विंटल नऊ हजार रु पये भाव द्यावा, ऊसाला तीन हजार रु पये एफ आर पी द्यावा इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.या मागण्यांचे निवेदन तलाठी ए.के. सपकाळ यांना देण्यात आले. या आंदोलनात माकपचे शांतीलाल पटेकर, बाबासाहेब पटेकर, रेणुकादास सुरवसे, मोहन भुंबे, शेतमजूर युनियनचे बळीराम भुंबे, किसान सभेचे नेते भाऊसाहेब झिरपे, बापू लव्हाळे, शिवाजी गायकवाड, मधुकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर लव्हाळे, सखाराम गरड, किसन कोरडे, अभिमान शिंदे, दादा लव्हाळे, शाहूराव लव्हाळे, सूर्यभान अडागळे, गुलाब गरड, अशोक गरड, रोहिदास मस्के, गंगाराम काळे यांच्यासह शेतकरी बैलगाडी व जनावरांसह सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन