आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक महासंघाच्या लढ्यास यश - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:23 AM2021-07-01T04:23:10+5:302021-07-01T04:23:10+5:30

केज : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपास यश आले. मानधनात ...

Success in the fight of Asha Swayamsevak, Group Promoter Federation - A | आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक महासंघाच्या लढ्यास यश - A

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक महासंघाच्या लढ्यास यश - A

googlenewsNext

केज : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपास यश आले. मानधनात दीड हजार रुपये वाढ व मिळणाऱ्या मानधनाचा मासिक अहवाल दिला जाणार असल्याचे मंजूर करण्यात आले आहे. याबद्दल संघटनेच्या आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक महासंघाच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा सत्कार मंगळवारी विडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडला.

राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला होता. सध्याची कोरोनाची परिस्थिती विचारात घेऊन शासनाने संघटनेच्या माध्यमातून मागण्या काही अंशी का होईना मंजूर केल्या आहेत. त्यामुळे शासन दरबारी चर्चेतून रास्त मागण्या सोडविल्याबद्दल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख व जिल्हाध्यक्ष सचिन आंधळे यांचा आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक, प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्ण कल्याण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य विजयकांत मुंडे, अशोक लोढा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले, आरोग्य अधिकारी डॉ.शीला कांबळे, सरपंच सूरज पटाईत उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी गटप्रवर्तक श्रीमती आशा ढाकणे, श्रीमती सुषमा चौरे यांच्यासह विडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविकांनी पुढाकार घेतला होता.

...

इतर मागण्यांसाठी लढा उभारणार

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या पाठीशी संघटना सदैव उभा राहणार आहे. कोरोना संकट संपताच इतर मागण्या शासनाकडून मंजूर करण्यासाठी संघटना लढा उभारणार असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांनी सांगितले.

===Photopath===

290621\1349img-20210629-wa0006.jpg

===Caption===

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख व जिल्हाध्यक्ष सचिन आंधळे यांचा आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, प्राथमिक आरोग्य केंद्र व रूग्ण कल्याण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Web Title: Success in the fight of Asha Swayamsevak, Group Promoter Federation - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.