ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाला; साखर महाग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:38 AM2021-08-17T04:38:18+5:302021-08-17T04:38:18+5:30
जिल्ह्याला दररोज लागते साखर (क्विंटलमध्ये) - १२०० क्विंटल श्रावणात मागणी वाढली - १५० क्विंंटल साखरेचे दर (प्रति किलो) ...
जिल्ह्याला दररोज लागते साखर (क्विंटलमध्ये) - १२०० क्विंटल
श्रावणात मागणी वाढली - १५० क्विंंटल
साखरेचे दर (प्रति किलो)
जानेवारी - ३४
फेब्रुवारी - ३४
मार्च - ३४
एप्रिल - ३४
मे - ३४
जून - ३५
जुलै - ३६
ऑगस्ट - ३८
का वाढले भाव ?
साखरेला पर्याय म्हणून गूळ आहे. मात्र साखरेच्या ठिकाणी साखर आणि गुळाच्या ठिकाणी गूळच वापरावे लागते. साखरेची आधारभूत किंमत वाढण्याची शक्यता आहे. दर अधिक जीएसटी आणि वाहतूकीमुळे साखरेचे दर आणखी वाढू शकतात. साखरेचे भाव ४० रुपये किलोपर्यंत होऊ शकतात. - जयनारायण अग्रवाल, व्यापारी, बीड.
-------
किरकोळ बाजारात साखर किलोमागे तीन रुपयांनी वाढली आहे. साखर कारखान्यांकडून टेंडर महाग गेल्याने दोन दिवसात हे भाव वाढल्याचे सांगितले जाते. साखरेच्या भाववाढीमुळे सामान्य ग्राहक नाराजी व्यक्त करत चौकशी करतात. आणखी काही दिवस भाव अनिश्चित राहण्याची शक्यता आहे.
- विनोद ललवाणी, व्यापारी बीड.
------
महिन्याचे बजेट वाढले
साखरेच्या तुलनेत चांगल्या प्रकारच्या गुळाचे भाव थोडे जास्तच आहेत. त्यामुळे साखरच घ्यावी लागते. चहा असेल किंवा गोड पदार्थ साखरेचाच वापर करावा लागतो. सध्या इतर किराणा वस्तूंच्या तुलनेत साखरेचे भाव फार काही वाढलेले नाहीत. ते स्थिरच राहायला हवे.- अलका विशाल साळुंके,गृहिणी,बीड
----------
पेट्रोल, डिझेल, गॅस वाढले इतर वस्तूंची ही भाव वाढतच आहेत. या महागाईत साखरही आता दोन -तीन रुपये किलोने महाग झाली आहे. ही वाढ किरकोळ असली तरी खाद्यतेलाचे भाव वाढतच आहेत. महगाईमुळे महिन्याचे बजेट वाढले आहे. - प्रतीक्षा प्रशांत मोकाशे, अलका विशाला साळुंके,गृहिणी,बीड
---------