अंबाजोगाई : दिवसाढवळ्या कंबरेला गावठी कट्टा (पिस्तूल) लावून बिनबोभाटपणे अंबाजोगाई शहरामध्ये फिरणाऱ्या तरुणाला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई यशवंतराव चव्हाण चौकातील न.प. शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर करण्यात आली. तर, शिरूरमध्ये एका इसमाचा पाठलाग करून तलवारीसह त्याला पकडण्यात आले.एलसीबी आणि एडीएसच्या वतीने अंबाजोगाई शहरातील फरारी आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गोविंद धर्मराज काळे हा तरुण कंबरेला गावठी कट्टा लावून यशवंतराव चव्हाण चौक परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी यशवंतराव चव्हाण चौक परिसरात सापळा लावला असता दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांना गोविंद हा तरुण नगर परिषद कॉम्प्लेक्ससमोर संशयास्पद अवस्थेत उभा असलेला दिसून आला. पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले आणि त्याच्याजवळील गावठी पिस्तुल जप्त केले. गोविंदला अंबाजोगाई शहर पोलिसांच्या हवाली करून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार आडके, कर्मचारी गलधर, भास्कर केंद्रे, गणेश दुधाळ, अन्वर शेख, हराळे यांनी पार पाडली.शिरुर कासारमध्ये तलवार जप्तशिरूर येथील इंदिरानगर भागात पापासिंग रामसिंग बावरी (३२) हा तलवार बाळगत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल धस यांना मिळाली. त्यांनी सापळा लावून बावरीला राहत्या घरामागून पळताना पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून तलवार जप्त करून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल धस, सखाराम पवार, रामदास तांदळे, गोविंद काळे, राजू वंजारे आदींनी ही कारवाई केली.
अंबाजोगाईत गावठी पिस्तूल, शिरूरमध्ये तलवार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:28 AM
दिवसाढवळ्या कंबरेला गावठी कट्टा (पिस्तूल) लावून बिनबोभाटपणे अंबाजोगाई शहरामध्ये फिरणाऱ्या तरुणाला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधकाच्या संयुक्त पथकाची कारवाई