बीड : जिल्ह्यात भीषण टंचाई असल्यामुळे ८९३ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता. त्यापैकी ८२४ टँकर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करतात. मात्र, मागील काही दिवसांपासून दुषित व गढूळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच टँकरच्या खेपा नियमांनूसार होत नसल्याचे नागरिकांमधून केली जात आहे.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिमुळे विहीर, बोअर आटले आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये टँकरच्या पाण्यावरच दैनंदिन गरजा नागरिकांना भागवाव्या लागत आहेत. मात्र, टँकरद्वरे पाणी पुरवठा करण्यासाठी जे उद्भव देण्यात आले आहेत. त्या ठिकाणची पाणी पातळी देखील खालावत चालली असल्यामुळे अनेक वेळा थेट तळ््यातून पाणी काही टँकर चालक पाणी भरत असल्यामुळे त्यांच्याकडून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. नागरिकांना पार्याय नसल्यामुळे दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे. त्यामुळे विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच दूषित पाण्यामुळे लहन मुले व वयोवृद्धांना याचा अधिक धोका निर्माण होत आहे. त्यामुळे स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करवी अशी मागणी मांजसुंबा, नेकनूर, सात्रा,पोथरा, येथील नागरिकांमधून करण्यात येत आहे.जिल्ह्यातील पाणीपुरवठा करणाºया टँकरची जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांमार्फत वेळोवेळी तपासणी केली जात आहे. पहिल्या टप्प्यातील तपासणीत जवळपास ५० टँकरला जीपीएस नसल्याचे समोर आले, तर पाणीपातळीतील घट तसेच उद्भव आटल्याने प्रशासनासमोर नवीन जलस्त्रोत आणि उद्भव शोधण्याचे आव्हान आहे. यातच दूषित पाण्याचे प्रमाण मोठे असल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.योग्य नियोजन आवश्यक : प्रकल्पातील पाणीसाठा ०.४५ टक्केपाली येथील बिंदूसरा, उखंडा, उपळी, सिंदफना, भायाळा, तांदळवाडी यासह ज्या इतर धरणांमधून पाणी उपसा केला जातो तेथील पाणीसाठा कमी होत आहे.आणखी एक महिना टॅक द्वरे पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.नागरिकांनी देखील याचे भान ठेऊन पाण्याचे योग्य नियोजन करुन वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.जिल्ह्यातील सर्व मध्यम व लघु ८३ प्रकल्पातील पाणीसाठा ०.४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.लहान-मोठे १४४ प्रकल्प आहेत. त्यापैकी ९४ प्रकल्पांमध्ये पाण्याचा एक थेंबदेखील शिल्लक नाही. इतर सर्व प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याच्या खाली आहे.त्यामुळे वेळेत पाऊस पडला नाही तर पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात टँकर संख्या ८९३, स्वच्छ पाण्याचा प्रश्न कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:13 AM
जिल्ह्यात भीषण टंचाई असल्यामुळे ८९३ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता. त्यापैकी ८२४ टँकर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करतात. मात्र, मागील काही दिवसांपासून दुषित व गढूळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठळक मुद्देग्रामीण भागात स्वच्छ पाणी देण्याची मागणी : पुरवठा करणाऱ्या प्रकल्पातील पाणीसाठा घटला