पुरुषोत्तम करवा ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : येथील माजलगाव धरणाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले असून, मागील दीड वर्षांपासून येथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. धरणाच्या भिंतीवर बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट, टेलिफोन इत्यादी बंद अवस्थेत आहेत. धरणाच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेल्या चार शस्त्रधारी पोलिसांपैकी दोन जण कमी करण्यात आल्यामुळे माजलगाव धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.पैठणच्या धरणानंतर सर्वात मोठे असलेले माजलगाव धरण हे मानले जाते. या धरणाच्या पाण्याची व्याप्ती देखील मोठी आहे. तसेच हजारो एकर जमीन या धरणामुळे ओलिताखाली आलेली आहे. बीडसह माजलगाव तालुक्यातील शेकडो गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या धरणातून होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात उपयोगिता असलेल्या या धरणाची सुरक्षा मात्र धोक्यात आली आहे. माजलगाव धरणावर धरणाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असून, या ठिकाणी सार्वजनिक वावर होऊ नये म्हणून चार सशस्त्र पोलीस देखील देण्यात आलेले होते. मात्र, मागील दीड वर्षांपासून येथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद अवस्थेत आहे.केवळ दोनच पोलीसयेथील कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिसांवर मोठा ताण येत असून सततच्या ड्युटीमुळे या कर्मचाऱ्यांची कर्तव्य निभावताना मोठीच कसरत होत असल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच केवळ दोन पोलीस कर्मचाºयांवर एवढ्या मोठ्या धरणाची सुरक्षा कशी शक्य आहे असा सवाल देखील निर्माण होत आहे.स्ट्रीट लाईट संपूर्णत: बंददुसरीकडे धरणाच्या भिंतीवर बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट संपूर्णत: बंद पडलेले असून रात्रीच्या वेळी या ठिकाणी भयाण अंधार पडतो. काही विघातक शक्ती या गोष्टींचा फायदा घेऊ शकतात. यातून काहीही अनर्थ घडू शकतो याचे भान धरणाचे काम पाहणाºया यंत्रणेला कसे काय नाही असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
माजलगाव धरणाच्या सुरक्षिततेचे वाजले तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:40 AM
येथील माजलगाव धरणाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले असून, मागील दीड वर्षांपासून येथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. धरणाच्या भिंतीवर बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट, टेलिफोन इत्यादी बंद अवस्थेत आहेत.
ठळक मुद्देदीड वर्षांपासून सीसीटीव्ही बंद : निगराणी करणारे दोन सुरक्षा पोलीस देखील केले कमी