समाधीवर दिवा लावण्यासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:33 AM2018-10-14T00:33:40+5:302018-10-14T00:34:11+5:30

जिवाचीवाडी येथील ४० वर्षीय महिला कुटुंबासह शेतात राहते. १० आॅक्टोबरच्या रात्री आठ वाजता सदरील महिला ही मयत सासऱ्याच्या समाधीवर दिवा लावण्यासाठी गेली. यावेळी ज्ञानोबा गोपाळ चौरे याने त्या महिलेवर अत्याचार केला.

Torture on a woman who went to light the lamp | समाधीवर दिवा लावण्यासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार

समाधीवर दिवा लावण्यासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
केज : जिवाचीवाडी येथील ४० वर्षीय महिला कुटुंबासह शेतात राहते. १० आॅक्टोबरच्या रात्री आठ वाजता सदरील महिला ही मयत सासऱ्याच्या समाधीवर दिवा लावण्यासाठी गेली. यावेळी ज्ञानोबा गोपाळ चौरे याने त्या महिलेवर अत्याचार केला.
याचवेळी पीडित महिलेचा मुलगा शेतातून घराकडे येत होता. त्याने हा प्रकार पाहत आरडाओरडा केला. चौरे याने हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला व मुलाला जीवे मारून टाकीन अशी धमकी देऊन पलायन केले. या भीतीपोटी दोन दिवसांपासून हे कुटुंब दहशतीखाली होते. शनिवारी दुपारी महिलेने पतीसह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. केज पोलीस ठाण्यात ज्ञानोबा गोपाळ चौरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शयामकुमार डोंगरे यांनी सांगितले.

Web Title: Torture on a woman who went to light the lamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.