लोकमत न्यूज नेटवर्कबीड : भरधाव ट्रॅव्हल्स्ने दुचाकीला धडक दिली. यामध्ये पत्नी जागीच ठार झाली, तर पती गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान बीडमधीलच एका खासगी रुग्णालयात जखमी पतीचा सायंकाळी मृत्यू झाला. हा अपघात बीड तालुक्यातील नामलगाव फाट्याजवळ रविवारी दुपारी घडला.कविता व सुभाष चव्हाण (रा. खांडवी तांडा, ता. बीड) असे अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. ते आपल्या दुचाकीवरुन (एमएच २० / १४९) गेवराईकडे जात होते. याचवेळी औरंगाबादहून बीडकडे येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स्ने (एमएच २० सीटी ४९५१) दुचाकीला जोराची धडक दिली. यात कविता चव्हाण या जागीच ठार झाल्या, तर सुभाष चव्हाण हे दूरवर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ बीड शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिवसभर उपचार झाले. मात्र, सायंकाळी ६ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेली नव्हती, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
ट्रॅव्हल्स्ची दुचाकीला धडक; दाम्पत्य ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:27 AM
भरधाव ट्रॅव्हल्स्ने दुचाकीला धडक दिली. यामध्ये पत्नी जागीच ठार झाली, तर पती गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान बीडमधीलच एका खासगी रुग्णालयात जखमी पतीचा सायंकाळी मृत्यू झाला. हा अपघात बीड तालुक्यातील नामलगाव फाट्याजवळ रविवारी दुपारी घडला.
ठळक मुद्देनामलगाव फाट्याजवळ झाला अपघात