कापसाने खचाखच भरलेल्या ट्रकने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:12+5:302020-12-31T04:32:12+5:30
मजूर कापूस भरतानाची घटना : विद्युत वाहिनीत अचानक स्पार्किंग आष्टी : तालुक्यातील कडा येथे कापसाने खचाखच भरलेल्या ट्रकला ...
मजूर कापूस भरतानाची घटना : विद्युत वाहिनीत अचानक स्पार्किंग
आष्टी : तालुक्यातील कडा येथे कापसाने खचाखच भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली. ट्रकवरील विद्युत वाहिनीत स्पार्किंग झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येते. आगीमुळे ट्रकमधील कापसाने क्षणार्धात पेट घेतला. प्रसंगावधान राखून नागरिकांनी वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.
कडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शैलेश कुमार गांधी यांचे अडत दुकान आहे. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास येथे ट्रकमध्ये कापूस भरण्याचे काम सुरू होते. मजूर कापूस भरत असताना ट्रकवरील विद्युत वाहिनीत अचानक स्पार्किंग झाली. यामुळे ट्रकमधील कापसाने पेट घेतला. क्षणार्धात आग मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र, नागरिकांनी प्रसंगावधान राखून पाण्याच्या साहाय्याने आग विझवली. वेळीच आग विझल्याने पुढील अनर्थ टळला. तरीही यात २ ते ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी सरपंच अनिल ढोबळे, उपसरपंच योगेश भंडारी यांनी भेट देऊन आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी बोलावून मदत केली.