ऊसतोड मजुराची उचलीवर उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:41 AM2021-09-16T04:41:18+5:302021-09-16T04:41:18+5:30
... बाजरी काढणीत गुंतला शेतकरी शिरूर कासार : तालुक्यात बाजरीचा पेरा घरखर्चापुरताच केला गेला होता. त्यातही पावसाने ऐनवेळी ओढ ...
...
बाजरी काढणीत गुंतला शेतकरी
शिरूर कासार : तालुक्यात बाजरीचा पेरा घरखर्चापुरताच केला गेला होता. त्यातही पावसाने ऐनवेळी ओढ दिल्याने काही बाजरीचे क्षेत्र होळपटले होते, तर राहिले बाजरी पीक अतिवृष्टीमुळे पाण्यात बुडाले होते. आता गेल्या पाच-सहा दिवसांपासून उघडीप दिल्याने शेतातील उभी बाजरी काढून बाहेर घेण्याच्या कामात शेतकरी व्यस्त झाला आहे. काही जणांनी तर फक्त बाजरीची कणसे कापून सुरक्षित ठेवण्याचे तंत्र वापरले असल्याचेही दिसून येत आहे.
...
तुरीला पाळी घालण्याचे काम सुरू
शिरूरकासार : तुरीच्या पिकात मूग, उडीद, सोयाबीन अशी आंतरपिके घेतली गेली; परंतु त्याची पावसाने वाट लावली. आता किमान तुरीचे पीक तरी हाती घेण्यासाठी शेतकरी तुरीच्या शेतात बैलपाळी घालू लागला आहे. या पाळीमुळे तुरीतील तण निघेल, तसेच तुडवून निबर झालेले शेत मोकळे होऊन तुरीला जोम धरण्यास मदतीचे होईल, असे शेतकरी सांगतात.
...
रबीसाठी पाणी देण्याची तरतूद करावी
शिरूर कासार : तालुक्याला वरदान ठरणारा सिंदफना मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहे. तसा तो गतवर्षीदेखील भरला होता; परंतु सिंचन विभागाच्या गाफीलपणामुळे रबीच्या पिकासाठी सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. यावर्षी तरी ती वेळ येऊ नये. खरिपाचा हंगाम गेला तरी किमान रबीचा हंगाम पाणी मिळाल्यास चांगला घेता येईल. मागील वर्षी झालेल्या चुकीची यावर्षी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आतापासूनच नियोजन करून त्रुटी दूर कराव्यात. वेळेवर शेतकऱ्यांना पाणी द्यावे, अशी मागणी होत आहे.
...
सावरगाव, बोरगावचा पुलावरचा स्लॅप वाहून गेला
शिरूर कासार : तालुक्यातील सावरगाव आणि बोरगावला जोडणाऱ्या नदीवरील पुलाचा स्लॅप पुरामुळे उलथून गेला आहे. यामुळे या पुलावरून वाहतूक ठप्प झाली आहे. सावरगावच्या नदीला मोठा पूर आला होता. त्या पुरामुळे पुलाची पुरती वाट लागली आहे.