दोन बळी; १६० नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:10+5:302021-07-23T04:21:10+5:30
बीड : कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दोनशेपार गेला होता. मात्र, गुरुवारी (दि. २२) रुग्णसंख्या घसरली. नवीन १६० रुग्णांची नोंद ...
बीड : कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दोनशेपार गेला होता. मात्र, गुरुवारी (दि. २२) रुग्णसंख्या घसरली. नवीन १६० रुग्णांची नोंद झाली. तसेच कोरोनामुळे आणखी दोघांचा बळी गेला.
जिल्ह्यात बुधवारी ४,४११ संशयितांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. गुरुवारी आलेल्या अहवालात १६० लोकांना कोरोनाची बाधा असल्याचे आढळून आले तर, ४,२५१ लोकांचे नमुने निगेटिव्ह आले. १६० रुग्णांमध्ये सर्वाधिक ५२ रुग्ण आष्टी तालुक्यातील आहेत. तर, अंबाजोगाई तीन, बीड ३१, धारुर १०, गेवराई ११, केज १३, माजलगाव तीन, परळी एक, पाटोदा १४, शिरुर कासार १२ आणि वडवणीच्या सात रुग्णांचा समावेश आहे. आता जिल्ह्याची रुग्णसंख्या ९५ हजार ५३४ झाली आहे. तर, गुरुवारी ११२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ९१ हजार २७८ झाली.
मागील २४ तासातील दोन कोरोनाबळींची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत २,५७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या बाहेर जिल्ह्यात ५१ आणि जिल्ह्यात १३८८ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.
----
'म्युकर' : दोघांना सुटी, एक रुग्ण वाढला
दरम्यान, म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत गुरुवारी आणखी एका रुग्णाची भर पडली. मात्र, उपचारानंतर आणखी दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २०३ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १३६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३६ रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.