केज तालुक्यातील साळेगाव केंद्रात कार्यरत सहशिक्षकाचा बदलीच्या धसक्याने दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 11:13 AM2017-10-27T11:13:31+5:302017-10-27T11:18:26+5:30

मागील दोन दिवसांपासून शिक्षक बदलीचा नेट कॅफेवर फॉर्म भरण्यासाठी रात्रभर जागरण आणि बदली कुठे होईल याच्या भीतीचा ताण सहन न झाल्यामुळे सहशिक्षक मधुकर दत्तात्रय साळवे( वय ४९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  निधन झाले.

Unlawful death by a replacement teacher working at Sagegaon center in Kej taluka | केज तालुक्यातील साळेगाव केंद्रात कार्यरत सहशिक्षकाचा बदलीच्या धसक्याने दुर्दैवी मृत्यू

केज तालुक्यातील साळेगाव केंद्रात कार्यरत सहशिक्षकाचा बदलीच्या धसक्याने दुर्दैवी मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देसहशिक्षक मधुकर सावळे हे बदली प्रक्रिया व भीतीने मानसिक तणावात होते.बुधवारी दुपारी ४ वाजता त्यांना अस्वस्थता जाणवू लागली आणि चक्कर येत असल्याने त्यांना कळंब जि. उस्मानाबाद येथिल एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

केज ( बीड ) : मागील दोन दिवसांपासून शिक्षक बदलीचा नेट कॅफेवर फॉर्म भरण्यासाठी रात्रभर जागरण आणि बदली कुठे होईल याच्या भीतीचा ताण सहन न झाल्यामुळे सहशिक्षक मधुकर दत्तात्रय साळवे( वय ४९) यांचे बुधवारी रात्री ९.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  निधन झाले. ते साळेगाव केंद्रातील मांगवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. 

सध्या शिक्षकांच्या बदलीचे ऑनलाईन अर्ज भरणे सुरु आहे. यातच ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची अधिकृत वेबसाईट व्यवस्थित काम करत नाही. कधी कधी अर्ज भरताना हे शिक्षण विभागाचे पोर्टल बंद पडते. यामुळे मागील दोन दिवसांपासून साळेगाव केंद्रातील मांगवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक मधुकर सावळे हे इंटरनेट कॅफेवर रात्री उशिरापर्यंत जागरण करत होते. तसेच आपली बदली कोठे होणार याची भीती सतत त्यांच्या मनात असल्याने ते मानसिक तणावात होते.

बुधवारी दुपारी ४ वाजता त्यांना अस्वस्थता जाणवू लागली आणि चक्कर येत असल्याने त्यांना कळंब जि. उस्मानाबाद येथिल एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बार्शी येथे हलविण्यात येत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. गुरुवारी त्यांच्यावर कळंब  येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात आले. सावळे यांनी केज तालुक्यातील साळेगाव केंद्रातील माळेगाव, बोबडेवाडी , मांगवडगाव आणि माजलगाव तालुक्यात अध्यापनाचे कार्य केली आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यू बद्दल शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Unlawful death by a replacement teacher working at Sagegaon center in Kej taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.