अंबाजोगाई मानवलोक परिसरात शेतकरी पुतळ्याचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:07+5:302021-04-03T04:30:07+5:30

हा पुतळा तयार करण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागला. मानवलोक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी पुतळ्याचे अनावरण मानवलोकच्या आवारात करण्यात ...

Unveiling of farmer's statue in Ambajogai Manavlok area | अंबाजोगाई मानवलोक परिसरात शेतकरी पुतळ्याचे अनावरण

अंबाजोगाई मानवलोक परिसरात शेतकरी पुतळ्याचे अनावरण

googlenewsNext

हा पुतळा तयार करण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागला. मानवलोक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी पुतळ्याचे अनावरण मानवलोकच्या आवारात करण्यात आले.

मानवलोकची नाळ तीन ते चार तालुक्यातील ग्रामीण भागात जोडलेली आहे. राज्यभर आपल्या कामाची छाप पाडली आहे. या संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक द्वारकादास लोहिया यांची सुरुवातीपासून इच्छा होती की मानवलोकच्या आवारात शेतकरी पुतळा बसवायचा, जो सर्वांना प्रेरणादायी ठरेल. हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मानस मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांचा होता. त्यांनी धारूर येथील नवोदित शिल्पकार ईश्वर उमाप यांची कला पाहून त्याला हे काम दिले. शिल्पकार ईश्वर यांना शेतकरी पुतळा तयार करताना बऱ्याच अडचणी आल्या. त्यावेळी नेमका शेतकऱ्यांचा पुतळा कसा असावा, याबाबत थोडा गोंधळ होता. परंतु ईश्वर यांचे आजोबा बाबुरावजी माने यांना शेतकरी पुतळ्याचे मॉडेल बनवले. त्यांचे चारही बाजूचे फोटो घेत त्या फोटोचे मोठे डिजिटल करून पुतळा तयार करण्याच्या परिसरात चारही बाजूने लावली. शेतकरी पुतळ्याचे काम या डिजिटल फोटोच्या माध्यमातून चालू केले. यावेळी ईश्वर यांने मेहनत घेऊन हे शिल्प बनवले. आपली पूर्ण कला या शिल्पात वाहिली. उत्कृष्ट असे शेतकरी शिल्प तयार झाले. या शिल्पाचे अनावरण मानवलोकच्या ३९ व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून करण्यात आले.

===Photopath===

020421\anil mhajan_img-20210402-wa0041_14.jpg

Web Title: Unveiling of farmer's statue in Ambajogai Manavlok area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.