शहराच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:29 AM2021-03-14T04:29:54+5:302021-03-14T04:29:54+5:30

अंबाजोगाई : शासनाच्या विविध योजना या विकासासाठी राबविल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर सर्वांनी एकत्र येत शहराच्या विकासासाठी ...

Various schemes of the government for the development of the city | शहराच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना

शहराच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना

googlenewsNext

अंबाजोगाई : शासनाच्या विविध योजना या विकासासाठी राबविल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर सर्वांनी एकत्र येत शहराच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. राज्यात जिथे जिथे चांगले व आदर्श काम झाले आहे अशा ठिकाणी भेटी देऊन ते प्रकल्प अन् योजना अंबाजोगाई शहरात राबवाव्यात, असे प्रतिपादन बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले.

अंबाजोगाई नगरपरिषदेच्यावतीने ‘माझी वसुंधरा अभियान-२०२०-२१’ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन केंद्रात घन वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपिन पाटील तसेच वनपाल कस्तुरे, शहर विकास संघ प्रमुख रोहिणी कडेकर, महिला आर्थिक विकासच्या व्यवस्थापक मीरा जाधव, वर्षा सूर्यवंशी, पाळवदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप म्हणाले, पर्यावरणाची हानी झाल्याने त्याचे परिणाम पुढील काळात दिसून येणार आहेत. पर्यावरणाला आपण जपले पाहिजे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियानातून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर म्हणाल्या, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पंधरा दिवसांत सहा हजार रोपे लावली. आपण झाड लावले त्याची फळे आपणास मिळतात. तसेच ऑक्सिजन मिळतो. ज्यांना शक्य होईल त्यांनी पाणवठे बनवावेत. ज्यामुळे मोकाट जनावरांकरिता पाण्याची व्यवस्था होईल. जपानच्या धर्तीवर मियावाकी पद्धतीनुसार वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी प्रास्ताविक केले. या अभियानांतर्गत वृक्षारोपण, जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, रेनवॉटर हार्वेस्टिंग, प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा, जलस्त्रोतांचे संरक्षण, संवर्धन, ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न, सौरऊर्जा वापरासाठी प्रोत्साहन या माध्यामतून निसर्ग संवर्धन करण्यावर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन कपिल कसबे यांनी केले. अजय कस्तुरे यांनी आभार मानले.

===Photopath===

130321\avinash mudegaonkar_img-20210313-wa0086_14.jpg

===Caption===

अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन केंद्रात घन वृक्ष लागवड कार्यक्रमात  जिल्हाधिकारी  रविंद्र जगताप यांनी वृक्षारोपण केले.

Web Title: Various schemes of the government for the development of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.