बीड : राज्यातील ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनने पुकारलेल्या असहकार व कामबंद आंदोलनाला शुक्रवार पासून सुरुवात झाली. या अंतर्गत जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या समोर ग्रामसेवकांनी धरणे आंदोलन केले. जिल्ह्यातील ६५० ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी झाल्याने ग्रामीण विकासाच्या योजनांश्ी निगडीत कामे होऊ शकली नाहीत. दरम्यान १३ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी अशी पदनिर्मिती करून वेतन त्रुटी दूर कराव्यात, २०११ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास सज्जे तसेच पदे वाढवावी, जुनी पेन्श्न लागू करावी, आदर्श ग्रामसेवक , राज्य, जिल्हास्तर, आगाऊ वेतनवाढ करुन एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती करणे, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करावीतगेवराईतही ग्रामसेवकांचे आंदोलनतालुक्यातील ग्रामसेवकांनी शुक्र वारी सकाळी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी बी.जे राठोड, बाबासाहेब कुडके, राजेंद्र बन, सुरेश सोलाट, श्रावण चव्हाण, आर.डी.हुलगे, शेषण कांबळे, अंकुश काळे, विलास मोरे, एस.पी इंगोले, जवरे, व्ही.आर. मस्के, सोपान मुसळेसह अनेक ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आष्टीत धरणेआष्टी : येथील पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामसेवकांनी धरणे आंदोलन केले. ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष डी.एम वाणी,उपाध्यक्ष ए.डी खिलारे,सचिव टी. डी.मुळीक, बाळासाहेब थोरवे, बी.ए. जगताप,जी.यु आहेर, एस.एम बोरूडे,नवनाथ लोंढे, डी. ई. घोडके, एस.डी गोरे, बी.एस डोके,पुरी महाराज, एस.डी तादळे,संतोष भोरे, निता कवडे, यु. बी म्हेत्रे, काका आगाशे आदी ग्रामसेवक सहभागी झाले होते.माजलगावातही आंदोलनमाजलगाव : येथील पंचायत समितीसमोर तालुकाध्यक्ष आर.जी.यादव, सचिव डि.एस.खरात, उपाध्यक्ष राजकुमार झगडे, सहसचिव डी.जे.करे, एन.एच.पवार, एस.बी.लेंडाळ, आर.एन.उध्दावंत, ए.ए.अंकुश, महिला प्रतिनिधी आवाड, एम.आर.गेंदले, राज्य कौन्सीलर एस.बी.गायकवाड यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक सहभागी होते.बीडमध्ये धरणे तर पाटोदा येथे ठिय्याबीड : येथील पंचायत समितीसमोर तालुका युनियनचे अध्यक्ष सखाराम काशीद, उपाध्यक्ष सुषमा पाटील, कैलास घोडके, सचिव भाऊसाहेब मिसाळ, प्रविण तेलप, प्रविण सानप, महादेव खेडकर, बाबासाहेब चव्हाण, पुष्पराज इनकर, बालाजी साळुंके, रामेश्वर घोडके यांच्यासह तालुकाभरातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. हक्काच्या मागण्यांसाठी एकजूट कायम राखण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.पाटोदा : येथील पंचायत समितीसमोर ग्रामसेवकांनी ठिय्या दिला. गटविकास अधिकाºयांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे, दत्ता नागरे , बनकर, खेडकर, सवासे तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते.
ग्रामसेवकांचे जिल्हाभरात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:15 AM
बीड : राज्यातील ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनने पुकारलेल्या असहकार व कामबंद आंदोलनाला शुक्रवार पासून सुरुवात झाली. या अंतर्गत जिल्ह्यातील ...
ठळक मुद्देग्रामीण विकासाशी संबंधित कामांना ब्रेक : बीड जिल्ह्यातील ६५० ग्रामसेवकांचा सहभाग