मतदार यादीचे शुद्धीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 04:04 AM2021-06-12T04:04:20+5:302021-06-12T04:04:20+5:30

आष्टी विधानसभा मतदार संघाअंतर्गत पाटोदा तालुक्यातील मतदार यादी शुद्धीकरण मोहीम चालू आहे. यामध्ये फोटो नसलेल्या मतदाराचे फोटो जमा ...

Voter List Purification Campaign | मतदार यादीचे शुद्धीकरण मोहीम

मतदार यादीचे शुद्धीकरण मोहीम

Next

आष्टी विधानसभा मतदार संघाअंतर्गत पाटोदा तालुक्यातील मतदार यादी शुद्धीकरण मोहीम चालू आहे. यामध्ये फोटो नसलेल्या मतदाराचे फोटो जमा करणे, दुबार नावे वगळणे, चुका दूर करणे इ काम सुरू आहे. पाटोदा तालुक्यात १,०२,१२१ मतदार असून, यापैकी २१० मतदारांचे यादीमध्ये फोटो नाहीत यापैकी बीएलओ मार्फत काही फोटो जमा केले आहेत. अजूनही २८ मतदारांचे फोटो जमा झालेले नाहीत कारण बीएलओच्या चौकशी रिपोर्टनुसार ते स्थलांतरित आहेत. नमूद पत्त्यावर राहत नाहीत अशा मतदारांनी आपले फोटो २० जूनपर्यंत तहसील कार्यालय पाटोदा किंवा संबंधित बीएलओ यांच्याकडे देण्यात यावेत अन्यथा नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल.

याचबरोबर पाटोदा तालुक्यात ५५ मतदारांची नावे दुबार आहेत. अशा मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांनी आपले एक नाव वगळण्याबाबत फॉर्म बीएलओकडे भरून द्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सुशांत शिंदे पाटोदा, तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी केले आहे.

Web Title: Voter List Purification Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.