परळीच्या विकासाची कावडही आता आम्ही वाहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:17+5:302021-07-23T04:21:17+5:30

परळी : परळीतील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची सेवा आम्ही पिढ्यान‌्पिढ्या करीत आलो आहोत व पुढेही पिढ्यान‌्पिढ्या ती सुरूच राहील. श्रावण ...

We will now carry the yoke of Parli development | परळीच्या विकासाची कावडही आता आम्ही वाहू

परळीच्या विकासाची कावडही आता आम्ही वाहू

Next

परळी : परळीतील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची सेवा आम्ही पिढ्यान‌्पिढ्या करीत आलो आहोत व पुढेही पिढ्यान‌्पिढ्या ती सुरूच राहील. श्रावण महिन्यात गंगेतील पाणी घेऊन येणारी कावड आम्ही कधी चुकू दिली नाही, तशाच पद्धतीने आता विकासाची 'कावड' वाहू, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

तीर्थक्षेत्र विकास योजनेतून शहरातील जुन्या तहसीलच्या भागात बांधण्यात येत असलेल्या भव्य यात्री (भक्त) निवास यासाठी १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार रस्त्यावरील कचरा व धूळ शोषून घेण्यासाठी आणलेल्या अत्याधुनिक स्विपर (व्हॅक्युम मशीन) मशीनचीही मुंडे यांनी पाहणी केली व अशा मशीन्स आणण्याच्या सूचना दिल्या.

या भूमिपूजन समारंभास मुंडे यांच्यासह आमदार संजय दौंड, राजेश देशमुख, नगराध्यक्षा सरोजनी हलगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, रा. कॉं. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, बाबासाहेब देशमुख, नंदकिशोर जाजू, प्रदीप देशमुख, अनिल तांदळे, विजयकुमार मेनकुदळे, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, नागनाथराव देशमुख, शरद मोहरीर, बाळकृष्ण पुजारी, भास्करराव चाटे यांसह देवस्थान कमिटीचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी, नगर परिषदेचे सर्व सभापती, पदाधिकारी व सर्व नगरसेवक, आदी उपस्थित होते.

३३/११ केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन

तत्पूर्वी धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी शहरातील व्हीआयपी सर्किट हाऊसच्या परिसरात महावितरणमार्फत उभारण्यात येत असलेल्या ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी मुंडे यांनी उपकेंद्र उभारणी, साईड ट्रॅक, आदी संदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, महावितरणचे मुख्य अभियंता रवींद्र कोळप, अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके, मोहन काळोगे, संदीप चाटे, श्री. अंबाडकर यांसह स्थानिक पदाधिकारी व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

शहरातील दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

परळी शहरातील संत भगवानबाबा चौक ते तहसील कार्यालय व दोस्ती टी हाऊस ते अग्रवाल आइस फॅक्टरी या दोन सिमेंट रस्त्यांच्या कामांचेही मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

घनशी नदीवर जलपूजन

परळी ते चांदापूर रस्त्यावरील घनशी नदीवर नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेले साखळी बंधारे ओसंडून वाहत आहेत. या बंधाऱ्यावर धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन झाले. या सर्व कार्यक्रमाला प्रा. मधुकर आघाव, दीपक देशमुख, वैजनाथ सोळंके, सभापती ऊर्मिला मुंडे, संगीता तूपसागर, गोपाळ आंधळे, सी. ओ. अरविंद मुंडे, शेख अन्वर, गंगासागर शिंदे, राजेंद्र सोनी, दिनेश गजमल यांसह नगरसेवक, पदाधिकारी, आदी उपस्थित होते.

Web Title: We will now carry the yoke of Parli development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.