संसारिक सुख हे मृगजळ, त्याच्या मागे धावू नका : गाढवे महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:37 AM2021-01-16T04:37:37+5:302021-01-16T04:37:37+5:30
आष्टी तालुक्यातील कुंभेफळ येथील गोरख काकडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. गाढवे महाराज म्हणाले की, उन्हाळ्याच्या ...
आष्टी तालुक्यातील कुंभेफळ येथील गोरख काकडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. गाढवे महाराज म्हणाले की, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एखादे हरीण पाण्याच्या शोधात असते. हरणाला मृगजळ हे पाण्याचा साठा असल्यासारखे दिसते आणि ते त्या दिशेने धावत सुटते. मात्र, हरीण जसजसे पुढे पुढे पळत जाते तसेतसे मृगजळ पुढे पुढे जाते, त्याप्रमाणे संसारामध्ये माणसाने सुख शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्या हरणासारखी गत होईल. माणसाबरोबर फक्त सत्कर्म येतं, त्यामुळे माणसाने सत्कर्म करत राहिले पाहिजे. पैसा, संपत्ती याला काही महत्त्व नसून, माणसाने आयुष्यभर केलेल्या सत्कर्माची आठवण लोक ठेवतात. एखाद्याच्या अंगणात पक्षी येतात, काही दिवस त्या ठिकाणी दाणे खाऊन उडून जातात. ते त्या ठिकाणी गुंतून राहात नाहीत. त्या मोहात ते पडत नाहीत. तसेच माणसाने संसार रुपी अंगणात राहिले पाहिजे, संसाराचा मोह न धरता ईश्वर नामामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही गाढवे महाराज म्हणाले.