याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील कानडी खुर्द येथील परमेश्वर दगडू गायकवाड हा कुटुंबासह राहतो. त्याच्याच भावकीतील विकास दुर्याेधन गायकवाड हा गावातच दारू विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्या दारू अड्ड्यावर अंभोरा पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी धाड टाकून कारवाई केली होती; पण ही माहिती परमेश्वर यानेच दिल्याचा राग मनात धरून व पोलिसांना तूच धंद्याची माहिती देतोस, असे म्हणत सोमवारी दुपारी चार जणांनी कडा बसस्थानक परिसरात लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. नंतर जिवे मारण्याची धमकी देत डोक्यात दगड मारून जखमी केले आहे. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात परमेश्वर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून विकास गायकवाड (रा. बीड सांगवी), विकास दुर्योधन गायकवाड, संजय दुर्योधन गायकवाड, राजू दुर्योधन गायकवाड (तिघे रा. कानडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कडा चौकीचे पो. ह. बाबासाहेब राख करत आहेत.