अधिक मास: ‘या’ गोष्टींचे आवर्जुन दान करा, दुपटीने पुण्य कमवा; कोणत्या दिवशी काय द्यावे? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 04:01 PM2023-07-21T16:01:47+5:302023-07-21T16:02:58+5:30

Adhik Maas 2023 Donation Daan: भारतीय संस्कृतीत दानाला अतिशय महत्त्व आहे. अधिक मासातील दान विशेष मानले जाते. सविस्तर जाणून घ्या...

adhik maas 2023 the significance of donation and do these things to get virtue of daan in adhik mahina 2023 | अधिक मास: ‘या’ गोष्टींचे आवर्जुन दान करा, दुपटीने पुण्य कमवा; कोणत्या दिवशी काय द्यावे? वाचा

अधिक मास: ‘या’ गोष्टींचे आवर्जुन दान करा, दुपटीने पुण्य कमवा; कोणत्या दिवशी काय द्यावे? वाचा

googlenewsNext

Adhik Maas 2023 Donation Daan: सन २०२० नंतर आता सन २०२३ मध्ये आलेल्या अधिक मासात अनेकविध शुभ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. २०२३ मध्ये श्रावण महिना अधिक आला आहे. १८ जुलैपासून सुरू झालेला अधिक श्रावण महिना १६ ऑगस्टपर्यंत राहणार आहे. त्यानंतर निज श्रावण सुरू होईल. मराठी महिन्यातील श्रावण महिना अधिक आल्यामुळे यंदाचा चातुर्मासाचा काळ हा पाच महिन्यांचा झाला आहे. अधिक महिना शुभ-फलदायी मानला जातो. भारतीय परंपरा, संस्कृती यांमध्ये दानाचे महत्त्व वेगळे आणि विशेष आहे. अधिक महिन्यातही यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते. कोणत्या दिवशी काय दान करावे? जाणून घ्या...

अधिक महिना व्रत-वैकल्ये, उपास, दान, पूजा, यज्ञ, हवन आणि ध्यानधारणा करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. या कालावधीत केलेल्या आराधना, उपासना, नामस्मरण, जप यांमुळे पापकर्मांचा क्षय होऊन पुण्यप्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. या कालावधीत दान केलेला एका रुपायाचे पुण्यफळ दसपटीने मिळते, अशी मान्यता आहे. तसेच पुरुषोत्तम महिन्यात श्रीकृष्ण कथा, श्री भागवत कथा, श्रीराम कथा, विष्णू सहस्रनाम, पुरुषसुक्त, श्री सुक्त, हरिवंश पुराण, गुरुने दिलेल्या प्रदत्त मंत्राचा नियमित जप, तीर्थस्थळी जाऊन स्नान आदी कार्ये केल्याने अधिक पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.

अधिक महिना आणि दानाचे महत्त्व 

भारतीय संस्कृती, परंपरा, संस्कार यांमध्ये दानाला अधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. अगदी रामायण, महाभारत काळापासून दानाचे महत्त्व अधोरेखित झालेले दिसते. कर्ण हा आपल्या दानशूरपणासाठी आजही ओळखला जातो. कोणतेही धार्मिक कार्य असले की, यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते. तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे, भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे, असे संस्कार आपल्याकडे प्राचीन काळापासून सुरू असल्याचे दिसतात. दीपदान, वस्त्र तसेच भागवत कथा ग्रथांचे दान अधिक महिन्यात अधिक पुण्य फलदायी मानले गेले आहे. असे केल्याने धन, वैभव, धान्य वृद्धिंगत होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अधिक महिन्यातही दानधर्म करण्याविषयी काही पुराणात, शास्त्रांमध्ये उल्लेख आल्याचे दिसते. इतकेच नव्हे, तर अधिक महिन्यातील कोणत्या तिथीला काय दान करावे, याचे नियमही घालून दिल्याचे दिसून येते.

अधिक महिन्यातील तिथीनुसार दान-धर्म 

- प्रतिपदा : तुप, चांदी यांचे दान करावे
- द्वितीया : सोने, कांस्य यांचे दान करावे
- तृतीय : चणे वा चण्याची डाळ यांचे दान करावे
- चतुर्थी : खारीक दान करावी.
- पंचमी : गुळ दान करावा.
- षष्ठी : अष्टगंध दान करावे.
- सप्तमी : रक्त चंदन, गोड पदार्थ, रंग यांचे दान करावे.
- अष्टमी : रक्त चंदन, कापूर, केवडा यांचे दान करावे.
- नवमी : केशर दान करावे.
- दशमी : कस्तुरी दान करावे.
- एकादशी : गोरोचन दान करावे.
- द्वादशी : शंख दान करावा.
- त्रयोदशी : घंटी, घंटा दान करावे.
- चतुर्दशी : मोती, मोत्याची माळ दान करावी.
- पौर्णिमा/अमावास्य : माणिक तसेच अन्य रत्ने दान करावी.


 

Web Title: adhik maas 2023 the significance of donation and do these things to get virtue of daan in adhik mahina 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.