शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ८ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
3
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
4
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
5
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
6
शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा
7
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
8
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
9
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
10
माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली
11
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
12
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
13
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
14
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
15
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
16
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
17
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
18
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
19
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
20
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर

Astro Tips: ४ एप्रिलनंतर वास्तू शांतीचे मुहूर्त थेट नोव्हेंबरमध्ये; भौमाश्विनी योगामुळे गुढी पाडवाही वर्ज्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 1:38 PM

Astro Tips Vastu Shanti: येत्या काळात तुम्हीसुद्धा वास्तूशांती करण्याच्या विचारात असाल तर त्याआधी लेखातील माहिती नीट वाचून घ्या!

नवीन वास्तू खरेदी केली किंवा एखाद्या जुन्या वास्तूमध्ये आपण नव्याने राहायला गेलो किंवा व्यवसायानिमित्त ती जागा वापरात काढली की सुरुवातीला तिथे गणपती पूजन, कलश पूजन आणि सवडीने वास्तू शांत करण्याचा हिंदू धर्मात प्रघात आहे. मात्र या वर्षात वास्तू शांतीचे मुहूर्त अतिशय कमी आहेत. एवढेच नाही तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा गुढी पाडव्याचा मुहूर्त देखील वास्तू शांतीसाठी वर्ज्य असणार आहे. कारण त्यादिवशी भौमाश्विनी योग आहे. मंगळवारी अश्विनी नक्षत्र आले की हा योग होतो. या योगावर देवी अथर्वशीर्ष जप अथवा देवी उपासना करावी. गुढी पाडवा हा जरी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी चैत्र मास हा वास्तुशांती करता वर्ज्य आहे.अनेक लोक हौशीने वास्तुशांती या दिवशी करतात .पण ते योग्य नाही.तसच रविवार व मंगळवार हे वास्तुशांती ला चालत नाही ते वर्ज्य आहेत.तसेच प्रतिपदा हि रिक्ता तिथी आहे. भौमाश्विनी हा देवी उपासनेचा दिवस आहे.अन्य काही नवीन आरंभ करु नये. मग या वर्षभरात नेमके मुहूर्त कधी आणि कोणते आहेत ते जाणून घेऊ, तत्पूर्वी वास्तू शांतीचे महत्त्वही जाणून घेऊ. 

वास्तू शास्त्रातही वास्तू शांतीच्या पूजेला महत्त्व दिले गेले आहे. जाणून घेऊया, की ही पूजा नेमकी कोणत्या उद्देशाने केली जाते? त्यामुळे लाभ कोणते होतात आणि आगामी काळात तुम्हालादेखील वास्तू शांत करायची असेल तर त्यासाठी शुभ मुहूर्त कोणते? 

वास्तुशांती का करावी?

निरंजन कुलकर्णी गुरुजी वास्तुशांतीचे महत्त्व सांगतात, 'वास्तुशांत का करावी? कारण वास्तू उभारली जात असताना खोदकाम, मोठ्या दगडांची तोडफोड, झाडांची कापणी, असंख्य प्राणी, जीव, जंतू, मुंग्या, पक्षांची घरटी या सगळ्यांचा नाश केलेला असतो. वास्तू तयार करण्यासाठी खूप यंत्रे वापरावी लागतात. त्यामुळे त्या वास्तुपुरुषाच्या शरीरालासुद्धा इजा पोहोचते. या सगळ्याचा जो दोष तयार होतो तो वास्तू विकत घेतल्यावर आपल्याला लागतो. हणून त्याची क्षमायाचना करता यावी, तसेच सर्व देवतांचे पूजन करून त्यांची प्रार्थना करता यावी. आपल्याला दोष लागू नये व वास्तू पुरुषांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून वास्तुशांत अवश्य करावी.'

वास्तुशांतीचे मुख्य लाभ : 

>> कुठल्याही जमिनीचे, बांधलेल्या वास्तूचे आणि आंतरिक व्यवस्थेचे दोष दूर होतात. >> वास्तू बांधताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सूक्ष्म जीवांच्या झालेल्या जीवितहानीच्या दोषमुक्तीची प्रार्थना. >> भावी घरात जाताना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून केलेली पूजा. 

वास्तूची भरभराट : 

>> वास्तुदोष दूर झाल्यामुळे घरातील सदस्यांना चांगले आरोग्य, ऐश्वर्य, धनसमृद्धीचे वरदान मिळते. >> होम हवन आदी गोष्टीमुळे घरातील वातावरण सकारात्मक होते. नकारात्मक ऊर्जा दूर होते. >> शुभ मुहूर्तावर गृहप्रवेश केल्याने वास्तू लाभते. >> वास्तू शांतीमुळे वास्तू देवता, कुल देवता यांचीही पूजा होते. आप्तेष्टांच्या येण्यामुळे आणि त्यांच्या आशीर्वादाने वास्तू पावन होते. 

वास्तुशांत कोणी व केव्हा करावी?

>> स्वतःची वास्तू नसेल पण अनेक वर्षांपासून तुम्ही भाड्याच्या जागेत राहात असाल तरीदेखील वास्तुशांत करणे इष्ट ठरते. >> स्वतःची वास्तू असेल तर प्रश्नच नाही, तुमच्या सवडीने शुभ मुहूर्त पाहून वास्तुशांत करू शकता. >> गृहप्रवेश झाल्यानंतर वर्ष-दीड वर्षानेदेखील वास्तुशांत करता येते. राहायला जाण्यापूर्वीच वास्तुशांत केली पाहिजे अशी सक्ती नाही. परंतु गृहप्रवेश करण्यापूर्वी वास्तू शांत करणे शुभ मानले जाते. 

आगामी काळातील वास्तू मुहूर्त :

मार्च : २७ मार्च २०२४    बुधवार    चित्रतिथी, द्वितीया नक्षत्र, सकाळी ०६:१७ ते दुपारी ४:१६२९ मार्च २०२४    शुक्रवार    पंचमी तिथी, अनुराधा नक्षत्र, रात्री ०८:३६ ते सकाळी ०६:१३, ३० मार्च३० मार्च २०२४    शनिवार    पंचमी तिथी, अनुराधा नक्षत्र, सकाळी ०६:१३ ते रात्री ०९:१३

एप्रिल : ४ एप्रिल २०२३    बुधवार    दशमी तिथी, उत्तरा आषाढ नक्षत्र, संध्याकाळी ०६:२९ ते रात्री ०९:४७

नोव्हेंबर :८ नोव्हेंबर, शुक्रवार    सकाळी ०६:३८ ते दुपारी १२.०३ पर्यंत    १३ नोव्हेंबर, बुधवार ते    १४ नोव्हेंबर  दुपारी ०१:०३ ते पहाटे ०३. ११  पर्यंत १६ नोव्हेंबर, शनिवार    संध्याकाळी ०७.२८ ते १७ नोव्हेंबर सकाळी ६.४४ पर्यंत१८ नोव्हेंबर, सोमवार    सकाळी ६.४६ ते दुपारी ३.४९ पर्यंत    २५ नोव्हेंबर, सोमवार    सकाळी ६.५२  ते २६ नोव्हेंबर मध्यरात्री १.२४ पर्यंत 

डिसेंबर: ५ डिसेंबर, गुरुवार    दुपारी १२.५१ ते सायंकाळी ५.२७ ११ डिसेंबर, बुधवार    सकाळी ७.३ ते ११. ४८ पर्यंत    १६ नोव्हेंबर, शनिवार    संध्याकाळी ७.२८ ते १७ नोव्हेंबर सकाळी ६.४४ पर्यंत२५ डिसेंबर, बुधवार    सकाळी ७. ११ ते दुपारी ३.२२ पर्यंत२८ डिसेंबर, शनिवार    सकाळी ७. १ ते रात्री १०. १३ पर्यंत    

टॅग्स :Astrologyफलज्योतिषVastu shastraवास्तुशास्त्र