ज्योतिषशास्त्र सांगते 'चौथ्या' प्रहरात पाहिलेली स्वप्नं खरी होतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 04:10 PM2021-04-30T16:10:56+5:302021-04-30T16:11:18+5:30

स्वप्नांमध्ये पाहिलेल्या व्यक्ती, वस्तु, प्रसंग यामुळे मन कधी सुखावते, तर कधी धास्तावते.

Astrology says that the dreams seen in the early morning come true ... | ज्योतिषशास्त्र सांगते 'चौथ्या' प्रहरात पाहिलेली स्वप्नं खरी होतात...

ज्योतिषशास्त्र सांगते 'चौथ्या' प्रहरात पाहिलेली स्वप्नं खरी होतात...

googlenewsNext

स्वप्नं कोणत्या प्रहरात पडतात, त्यावर त्यांची सत्य-असत्यता अवलंबून असते. सगळीच स्वप्ने खरी होतात असे नाही. कित्येक स्वप्नं झोपून उठल्यावर आठवतही नाहीत. तर कित्येक स्वप्न चित्रपटासारखी लख्ख आठवतात. अनेक दिवस स्मरणात राहतात.स्वप्नांमध्ये पाहिलेल्या व्यक्ती, वस्तु, प्रसंग यामुळे मन कधी सुखावते, तर कधी धास्तावते. आजवर आपण ऐकत आलो आहोत, की पहाटेची स्वप्ने खरी ठरतात. यावर स्वप्नांचा आणि प्रहराचा ज्योतिषशास्त्राने सविस्तर खुलासा केला आहे. 

प्रथम प्रहर : जी स्वप्ने रात्री झेपल्यावर रात्री १० वाजल्यापासून १२ वाजेपर्यंतच्या वेळेत पडतात, ती शरीरप्रकृतीची द्योतक असतात, प्रीतीची द्योतक असतात, सट्टा किंवा लॉटरी अशा अनपेक्षित लाभाची द्योतक असतात विंâवा घरच्या प्रापंचिक संबंधाची, काही विशिष्ट घडामोडींची द्योतक समजली जातात.

द्वितीय प्रहर : जी स्वप्ने द्वितीय प्रहरात पडतात, म्हणजे १२ वाज्यापासून २ वाजेपर्यंतच्या काळात पडतात, ती स्वप्ने प्रवासाची, व्यापार, पत्रे, नवीन गोष्ट, कर्ज, खर्च, इ. संबंधी असतात आणि स्वत:पुरत्याच घरातल्या अडचणींची व मित्रासंबंधीची द्योतक समजली जातात.

तृतीय प्रहर : जी स्वप्ने तृतीय प्रहरात म्हणजे रात्री २ पासून पहाटे ४ च्या आधीच्या काळात पडतात, ती नातेवाईकांशी संबंध, प्रवास, कार्य यांची द्योतक असतात.

चतुर्थ प्रहर : अर्थात पहाटेची स्वप्ने! ही स्वप्ने पहाटे ४ ते ६ दरम्यान पडतात ती जास्त सत्य समजली जातात. कारण त्यांच्या अगोदर कित्येक घडामोडी विचार शक्तीने मेंदूत होऊन तो स्वस्थ असतो व अशा वेळेस सर्वशक्तिमान आत्माच आपले भविष्यकालीन दृष्य आठवत असतो आणि आपल्या सुख दु:खाचे, भावी कल्पनांचे चित्र डोळ्यासमोर रेखाटत असतो. ही पहाटेची स्वप्ने उत्तम प्रवासाची द्योतक असतात. इच्छाशक्तीची वाट दर्शवणारी व ती इच्छाशक्ती पूर्णतेस जाणार याची द्योतक असतात. स्त्रीलाभ, धन, वाहन, स्वत:च्या उपयोगी पडणारा पैसा व हाती घेतलेले कार्य तडीस जातील अशा प्रकारची सूचक असतात, असे म्हटले जाते. 

Web Title: Astrology says that the dreams seen in the early morning come true ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.