राशीनुसार केलेले मंत्रोच्चारण अधिक लाभदायक ठरते; जाणून घ्या तुमच्या राशीसाठी सुयोग्य मंत्र कोणता?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 12:17 PM2021-04-29T12:17:49+5:302021-04-29T12:18:06+5:30
अध्यात्मामध्ये आणि ज्योतिष शास्त्रानेदेखील नामस्मरणाला पर्याय नाही, असे सांगितले आहे.
प्रत्येक राशीवर त्याच्या राशी स्वामींचा आणि नवग्रहांचा परिणाम दिसून येतो. परंतु त्याहीपेक्षा अधिक परिणामकार ठरते, ती म्हणजे उपासना. आपल्या ग्रहांची दशा योग्य आहे की अयोग्य हे आपल्याला ज्ञात नाही आणि तेवढा आपला अभ्यासपण नाही. परंतु, कितीही वाईट ग्रहदशा असेल, तरी परमेश्वर कृपेने प्राप्त परिस्थितीवर मात करण्याचे बळ प्राप्त होते. म्हणून अध्यात्मामध्ये आणि ज्योतिष शास्त्रानेदेखील नामस्मरणाला पर्याय नाही, असे सांगितले आहे. नामस्मरण करण्यासाठी जपाची माळ हे माध्यम वापरले जाते.
प्रत्येकाने आपल्या इष्टदेवतेची पूजा, अर्चा करावी, नामस्मरण घ्यावे, त्याचबरोबर आपल्या राशीला अनुकूल अशा मंत्राचा जप करावा असे ज्योतिष शास्त्र सांगते. राशीनुसार केलेल्या नामजपामुळे ग्रहस्थिती सुधारण्यात नक्कीच मदत होते. म्हणून पुढे दिलेले मंत्र आपल्या राशी नुसार दिवसातून एकदा जपावेत. हे मंत्र भगवान महाविष्णूंचे प्रभावी मंत्र आहेत. भगवान विष्णू हे जगताचे पालक आहेत, ते आपल्या मार्गातील अडचणी दूर करतील तसेच अडचणींवर मात करण्याचे बळ अवश्य देतील. यासाठी श्रद्धेने आणि शांत चित्ताने हे नामस्मरण करावे.
मेष- ॐ ह्रीं श्रीं श्रीलक्ष्मीनारायणाय नम:।
वृषभ- ॐ गोपालाय उत्तरध्वजाय नम:।
मिथुन- ॐ क्लीं कृष्णान नम:।
कर्क- ॐ ह्रीं हिरण्यगर्भाय अव्यक्तरूपिणे नम:।
सिंह- ॐ क्लीं ब्राह्मणे जगदाधाराय नम:।
कन्या- ॐ पीं पिताम्बराय नम:।
तुला- ॐ तत्वनिरंजनाय तारक रामाय नम:।
वृश्चिक- ॐ नारायणाय सूरसिंहाय नम:।
धनु- ॐ श्रीं देवकृष्णाय उर्ध्वजाय नम:।
मकर- ॐ श्रीं वत्सलाय नम:।
कुंभ- ॐ श्रीं उपेन्द्राय अच्युताय नम:।
मीन- ॐ क्लीं उद्धृताय उद्धारिणे नम:।