मुले अभ्यासाचा कंटाळा करतात? मग 'या' वास्तू टिप्स वापरून बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 10:00 AM2021-09-25T10:00:00+5:302021-09-25T10:00:02+5:30
घरात चार पैसे कमी असले तरी चालतील परंतु ज्ञानाची कमतरता नको. अज्ञान तर घरात नकोच नको! म्हणून लहान मुलांना ...
घरात चार पैसे कमी असले तरी चालतील परंतु ज्ञानाची कमतरता नको. अज्ञान तर घरात नकोच नको! म्हणून लहान मुलांना कधीही भेटवस्तू बरोबर एखादे गोष्टीचे, माहितीचे, ज्ञान विज्ञानाचे पुस्तक अवश्य भेट द्या. आपल्या घरात स्वतःची छोटीशी स्वतंत्र लायब्ररी हवी. कारण पुस्तकातून जे ज्ञान मिळेल, तेवढे सखोल ज्ञान इंटरनेटवर मिळेलच असे नाही. म्हणून कितीही यंत्रयुग झाले, तरी पुस्तकांना पर्याय नाही. म्हणून बालपणापासूनच मुलांना घरच्या घरी छोटेसे ग्रंथालय तयार करून द्या. छान छान पुस्तकांचा संग्रह करून त्यासाठी घराचा एक कोपरा ठेवा. तो कोपरा कोणता असायला हवा, हे आपण वास्तुशास्त्राच्या आधारे समजून घेऊ.
वास्तुशास्त्रानुसार घरात पुस्तकांसाठी योग्य दिशा :
>>वास्तुशास्त्रानुसार विद्यार्थ्याचा अभ्यास तक्ता अशा दिशेला असावा की त्याचा चेहरा पूर्वेकडे असावा. हे देखील लक्षात ठेवा की अभ्यास करताना विद्यार्थ्याची पाठ दरवाजाच्या दिशेने नसावी.
>>वास्तुशास्त्रानुसार, अभ्यासाची खोली नेहमी उत्तर आणि पूर्व, उत्तर आणि पश्चिम, पश्चिम आणि पश्चिम यांच्या मध्यभागी केली पाहिजे.
>>वास्तुशास्त्रानुसार, अभ्यासाच्या खोलीत पुस्तके कधीही खुल्या रॅकवर ठेवू नयेत. त्यासाठी साचेबद्ध कपाट असावे. त्यामुळे पुस्तकांच्या संख्येचे दडपण न येता, रोज वेगवेगळी पुस्तकं शोधून वाचण्याची त्यांना सवय लागते.
>>वास्तुशास्त्रानुसार, पुस्तक कपाट किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पुस्तके ठेवली आहेत ती जागा नेहमी स्वच्छ असावीत. तेथील धूळ आणि मातीमुळे विद्यार्थ्यांना निरुत्साह वाटू शकतो. यासाठी त्यांचा अभ्यासाचा कोपरा आकर्षक असावा. त्यासाठी छोटीशी रोपं, आकर्षक घड्याळ, पडदे यांचा बखुबीने वापर करता येईल.
>>वास्तुशास्त्रात ड्रॉइंग रूममध्ये बुक शेल्फ ठेवणे चांगले मानले जाते, तर बेडरूममध्ये ते टाळावे. बेडरूममध्ये पुस्तके ठेवल्याने वाचनापेक्षा झोपच जास्त येत राहील आणि बेड खुणावत राहील. म्हणून वाचनाची खोली उजेडाची आणि प्रसन्न असावी.
>>विद्यार्थ्यांच्या बुकशेल्फला जोडून एखादा फळा असावा. त्यावर मुद्दे मांडण्याची किंवा आवडलेल्या गोष्टी लिहून काढण्याची सवय लावावी. ही चांगली सवय भविष्यात त्यांना उपयुक्त ठरू शकते आणि त्यांची वाचनाची अभिरुची वृद्धिंगत होऊ शकते.