जीवनात चांगले कर्म करा, फळ चांगलेच मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 05:53 PM2021-01-20T17:53:00+5:302021-01-20T17:53:27+5:30
पाप केल्यावर भोग हे भोगावेच लागतात. यासाठी सर्वांनी चांगले कर्म करणे गरजेचे आहे. कर्म चांगले केले तर त्याचे फळही चांगलेच मिळेल. पाप करु नका. चूक करु नका. आई, वडील गुरूंची सेवा करा. पाप केल्यावर स्वत:ला भोग प्राप्त होतातच.
अध्यात्म
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥४-७॥
अध्याय क्रमांक-४ मध्ये श्लोक ७ वा आहे. या श्लोकाव्दारे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पृथ्वीवर अधर्म होतो. त्यावेळी भगवान (देव) अवतार घेतात. हे अर्जुना, जेंव्हा धर्माला क्षीणता येते व अधर्माचा जिकडे तिकडे प्र्नादुर्भाव होतो, तेंव्हा तेंव्हा मी स्वत:ला उत्पन्न करतो. मी मायेने शरीर धारण करतो.
याचे दोन प्रकार पडतात. १) माया-प्रकृती २)ब्रम्हा-ज्या गोष्टीला आकार नाही. मायापासून दूर असते याला ब्रम्हा म्हणतात.
जेंव्हा जेंव्हा धर्मावर संकटे येते, त्यावेळी स्वत: देव पृथ्वीवर अवतार घेतात. उदा-प्रल्हाद व हिरण्यकश्यपू.
हिरण्यकश्यपू याने पृथ्वीवर हाहाकार करुन खूप अन्याय, पाप केले. तो देवाला मानत नसे. स्वत:लाच देव समजत असे. पण काही दिवसांनी हिरण्यकश्यपू व कयाहू याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला येतो. त्याचा सांभाळ करण्यासाठी भगवान अवतार घेतात. नरसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा नाश करतात.
हिरण्यकश्यपूने तप करुन भगवान शंकराकडून वर प्राप्त केला होता. मला मरण घरात नको, दारात नको. जमिनीवर नको. सूर्य उगवल्यावर नको. सूर्य मावळल्यावर नको. शस्त्राने नको. यावेळी भगवान शंकरांनी तथास्थू म्हटले. यानंतर विष्णूला अवतार घ्यावा लागला. नरसिंह रुपाने हिरण्यकश्यपूला उंबºयावर धरला. त्याचे नखाने पोट फाडले. अशा रितीने दुष्टाचा नाश करुन भक्तांचा सांभाळ केला.
साधूंचे रक्षण करण्यासाठी दुष्टाचा समूळ नाश करण्यासाठी व धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार करतो.
अहंकार-मानवी जीवनामध्ये अहंकार येऊ देऊ नये. देवाला अहंकार जमत नाही. सर्व देवच करतो, असे समजावे.
एक राजा होता. एक प्रधान होता. तेव्हा राजा म्हणतो हे सर्व कोण करतो. तेव्हा प्रधान म्हणतो, देव करतो. राजा म्हटला, प्रधान मला ते कसे सांगा? तेव्हा प्रधान म्हणतो, राजा हे सांगण्यासाठी तुला सिंहासन सोडून खाली बसावे लागेल. तुझे वस्त्रे मला घालण्यासाठी द्यावे लागतील. तेव्हा राजा होय म्हणाला. त्याने प्रधानाला वस्त्रे दिली. यानंतर प्रधान सिंहासनावर बसला. राजाला म्हणाला, आता मी राजा आहे. तुम्ही प्रधान. त्यावेळी प्रधान झालेला राजा म्हणाला, देव हेच करतो. वरच्याला खाली आणि खालच्याला वर घेतो.
याचा सांगण्याचा अर्थ असा आहे की, पाप केल्यावर भोग हे भोगावेच लागतात. यासाठी सर्वांनी चांगले कर्म करणे गरजेचे आहे. कर्म चांगले केले तर त्याचे फळही चांगलेच मिळेल. पाप करु नका. चूक करु नका. आई, वडील गुरूंची सेवा करा. पाप केल्यावर स्वत:ला भोग प्राप्त होतातच.
याचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की, पाप करु नका. कोणावर अन्याय करु नका. चूका करु नका. चुकीचे कर्म केले तर त्याचे भोग स्वत:लाच भोगावे लागतात. अर्धमाने वागल्यानंतर देव स्वत: शिक्षा करतो. भक्तांचे रक्षण करतो.
-गोरख महाराज शिंदे, तळवडी दत्त मंदिर प्रमुख.
९८५०९५६८२७.