Kalbhairav Jayanti 2024: कालभैरव जयंतीनिमित्त मृत्यूवर मात करणाऱ्या कालभैरवाचे स्वरूप समजावून घेऊया!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 02:21 PM2024-11-23T14:21:20+5:302024-11-23T14:21:34+5:30

Kalbhairav Jayanti 2024: आज कार्तिक अष्टमी, हा दिवस कालभैरव जयंती म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्त महादेवाच्या या अवताराबद्दल अधिक जाणून घेऊ. 

Kalbhairav Jayanti 2024: Today on the occasion of Kalbhairav Jayanti let's understand the nature of Kalbhairav who conquered death! | Kalbhairav Jayanti 2024: कालभैरव जयंतीनिमित्त मृत्यूवर मात करणाऱ्या कालभैरवाचे स्वरूप समजावून घेऊया!

Kalbhairav Jayanti 2024: कालभैरव जयंतीनिमित्त मृत्यूवर मात करणाऱ्या कालभैरवाचे स्वरूप समजावून घेऊया!

>> योगेश काटे, नांदेड 

शिवाचे उग्र व भीषण असे एक रूप. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचेही मानले जाते.

पुराणांच्या मते कालिकापुराणाच्या मते पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला, त्याचा जन्म रात्रीच्या चौथ्या प्रहरी झाल्याचे मानले जाते. कार्तिक वद्य अष्टमीला भैरवजयंती हे काम्यव्रत केले जाते.

गळ्यात नरमुंडमाला हातात नरमुंड अंगावर हत्तीचे कातडे सापाचे दागिने चार, आठ, बारा वा अधिक हातांतून तलवार, बाण, त्रिशूळ, दोरी इ. आयुधे ५ चेहरे इ. रूपांतील भैरव नावाप्रमाणेच उग्र भासतो. दांडगाई करणाऱ्या माणसाला ‘टोळभैरव’ म्हणतात, याचे कारणही भैरवाची उग्रताच होय.  ओरिसातील मूर्ती विश्वपद्मावर उभ्या  तेथील काही मूर्ती तीन डोळे व मिशा असलेल्या. राजस्थानातील प्रत्येक गावात शमी वृक्षाखाली त्याची मूर्ती वा तांदळा असतो. पंजाबात त्याला मृत्यूला भिवविणारा देव मानले जाते. भैरव कुत्र्याबरोबर असतो वा त्याच्यावर स्वार होऊन राहतो,  (कुत्रा हा ज्याचा घोडा म्हणजे वाहन आहे, तो) म्हणतात. तो शैवमंदिरांचा द्वारपाल व शक्तिपीठांचा संरक्षक आहे, भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली, तर ती निष्फळ मानली जाते.

शेतकरी पेरणीच्या व कापणीच्या प्रसंगी त्याची पूजा करतात. त्याच्यामुळे भूतबाधा, सर्पदंश वगैरेंचा प्रभाव नष्ट होतो, असे ते  मानतात शैव आगमांनुसार एकूण ६४ भैरवांचे आठ वर्ग असून त्या वर्गांच्या आठ प्रमुखांना ‘अष्टभैरव’ म्हणतात. तंत्रग्रंथांनुसार ६४ भैरव हे ६४ योगिनींचे स्वामी असतात. अष्टभैरवांच्या नावांविषयी बरेच मतभेद आहेत.  शांतिकर्मात व शैव व्रताच्या उद्यापनात अष्टभैरवांना आहुती दिली जाते.

अष्टभैरवांपैकी कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते. त्याला पापभक्षण, आमर्दक, काळराज इ. नावेही आहेत. काशीत जाताना प्रथम त्याचे दर्शन घ्यावयाचे व परतताना त्याच्या नावाचा काळा गंडा बांधावयाचा, अशी प्रथा आहे. उज्जैनजवळील भैरवगढ या कोटात त्याचे भव्य मंदिर आहे. मार्गशीर्ष वद्य अष्टमी ही कालभैरवाष्टमी म्हटली जाते. आश्विन, कार्तिक व भाद्रपद वद्य अष्टमीला कालाष्टमी हे त्याचे व्रत केले जाते. शेंदूर व तूप यांनी संतुष्ट होणारा एक बालभैरवही आहे. नेपाळमधील नेवार लोक वीरभद्राचे रूप असलेल्या पाचलीभैरवाची पूजा करतात. सूर्य व शिव यांचे संयुक्त स्वरूप असलेल्या मार्तंडभैरवाची त्रिमुखी मूर्ती आढळली आहे. शिवाचे बटुकभैरव नावाचे एक तामसरूपही आढळते. दक्षिण भारतातील शैव मंदिरांची रक्षकदेवता असलेल्या क्षेत्रपालाला महाभैरव म्हणतात. राजस्थानात भूतपिशाचांना ताब्यात ठेवणारे काला व गोरा असे दोन भैरव असून माघ महिन्यात त्यांचा लोकोत्सव असतो.

पुराणांच्या मते भैरवाने जन्मल्याबरोबर सर्व देवांचे दमन केले. म्हणून शिवाने त्याला वृक्ष होण्याचा शाप दिला. तोच दमनक वा तातिरी हा वृक्ष होय. त्याची पूजा केल्याखेरीज देवांच्या पूजेचे फल मिळणार नाही, असा शिवाने उःशाप दिला. ब्रह्मदेवाने शंकराचा अपमान केल्यावर त्याच्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्मला, त्याने ब्रह्‌ग्याचे शिवनिंदा करणारे पाचवे मस्तक तोडले. सर्व तीर्थांना जाऊनही भैरवाचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले नाही. शेवटी काशीत त्याला पापमुक्ती मिळाली व त्याने ब्रह्‌म्याचे मस्तक जेथे ठेवले ते तेथे कपालमोचनतीर्थ बनले.

भीषण गोष्टींना भिवविणारा’ या अर्थाने विष्णू व शंकर यांना भैरवतर्जक म्हटले जाते. कालिकापुराणानुसार वारणासीचा राजा व खांडवनाचा निर्माता विजय हा भैरवाचा वंशज होता. भैरव हे नाव धारण करणारे भैरवपुराण, भैरवतन्य इ. ग्रंथ आढळतात. संगीतातील रागाला भैरव असे नाव आहे.

भैरवी हे भैरव या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप असून दुर्गेचे एक रूप, महाविद्यांपैकी सहावी देवी, शिवाच्या दहा शक्तींपैकी एक, आठ अबांपैकी एक, नित्य प्रलय घडवून आणणारी मृत्युशक्ती, दुर्गेच्या महोत्सवात दुर्गेचे काम करणारी १२ वर्षांची मुलगी, हिंदुस्थानी संगीतातील एक राग इ. अर्थांनी हा शब्द वापरला जातो. काशीला मरण पावलेल्या व्यक्तीला सद्‌गती मिळण्यासाठी भैरव ज्या यातना भोगावयास लावतो, त्यांना भैरवी यातना म्हणतात. भैरव शब्दाचे भैरवा असेही स्त्रीलिंगी रूप असून दुःखाची देवता निर्ऋती व अप्सरांचा एक वर्ग असे त्याचे अर्थ आहेत.

ll श्रीकृष्णार्पणमस्तु ll

Web Title: Kalbhairav Jayanti 2024: Today on the occasion of Kalbhairav Jayanti let's understand the nature of Kalbhairav who conquered death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.