शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग ७)  

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 27, 2021 09:00 AM2021-01-27T09:00:00+5:302021-01-27T09:00:02+5:30

महिषासुर मर्दिनी स्तोत्र आपण आजवर बऱ्याचदा ऐकले असेल. त्याची लयबद्ध रचना आपल्याला भुरळ पाडते. परंतु त्याचा अर्थ समजून घेतला, तर स्तोत्र ऐकण्याचा आनंदही द्विगुणीत होईल. शाकंभरी नवरात्रीनिमित्त येत्या आठ दिवसात रोज तीन प्रमाणे चोवीस श्लोकांचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 

Meaning of verses in Mahishasurmardini stotra on the occasion of Shakambhari Navratri! (Part 7) | शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग ७)  

शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग ७)  

Next

रवींद्र गाडगीळ

महिषासुर मर्दीनी स्तोत्राच्या अठरा कडव्यांचा अनुवाद काल पाहिला, आता पुढील तीन श्लोकांचा अर्थ समजावून घेऊया. 

कनकल सत्कल सिंधु जलैरनू सिंचती योषण रंग भुवं, 
भजति स कीं न शचिकूच कुंभ तटी परिरंभ सुखानू भवम, 
तव चरणम शरणं करवाणि सुवाणी पथम मम देही शिवम, 
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||१९||

सुवर्णवर्णाच्या घड्यांनी सागराच्या पाण्याने ज्या योगिनीच्या बरोबर तुझ्या प्रांगणात रंग खेळत असतेस, त्या इंद्राणीचा संग लाभ सुखानुभव मी कल्पनेनेच अनुभवतो, हे पार्वती देवी, तुझ्या चरणाशी जो रत होतो, जेथे सर्व देवता कायम आपले मस्तक ठेऊ इच्छितात, टी तू आमचे कल्याण कर. म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

हेही वाचा : शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग ५)  

तव विमलेन्दूकलं वदनेंदुमलम सकलम यन्ननूकुलयते, 
कीमु पुरहूत पुरीन्दू मुखी सुमुखी भी रसौ विमुखी क्रियते | 
मम तू मतं शिवनाम धने भवती कृपया किमू न क्रियते, 
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||२०||

तुझ्या उत्साही आनंदी चंद्रमुखी चेहर्‍याकडे बघितले, की इंद्रपुरीच्या सुंदर सुंदर अप्सरांकडेही बघावेसे  वाटणार नाही,अशी तू त्रिपुरसुंदरी.  त्यामुळे मला पक्की खात्री आहे की जो भक्त शिवाचे नामस्मरण सदा करत असेल, त्यावर तू शिवप्रिया कृपा का करणार नाहीस? म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

अयी मयी दीनदयालू तया कृपयेव त्वया भवितव्यमुमे, 
अयी जगतो जननीती यथाsसी मयाsसि तथाsनुमतासी रमे | 
यदूचीतमत्र भवत्पुरगम कुरु शांभवी देवी दयां कुरू मे, 
जय जय हे महिषसुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||२१||

हे उमा, तू दयाळूपणे आमच्यासारख्या दीनांवर कृपावंत हो, कारण तूच आमची पोषणकर्ती अन्नपूर्णा माता आहेस, म्हणूनच आम्ही तुझी विविध रुपात ध्यानधारणा करीत असतो, आमचा हा भवताप नष्ट कर, अर्थात तू तुला जे आमच्या बाबतीत उचित वाटेल तेच कर, आणि तू ते करशीलच. म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

म्हणून हे जगदंबे शाकंभरी देवी, आम्हावर कृपावंत हो. आम्हाला सन्मार्गात ठेव. आमच्या हातून सत्कार्यच होऊ दे. देव, देश, धर्म यासाठीच आमचे आयुष्याचे सार्थक होऊ दे. जयोस्तूsते. पुढील श्लोक उद्या. 

हेही वाचा : शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग ४)  
 

Web Title: Meaning of verses in Mahishasurmardini stotra on the occasion of Shakambhari Navratri! (Part 7)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.