मन करारे प्रसन्न...पण कसे? जाणून घ्या, शांतिगिरीजी महाराजांकडून, आजच्या लोकमत युट्युब live चर्चासत्रात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 07:30 AM2020-11-15T07:30:00+5:302020-11-15T07:30:02+5:30
१५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता Live ऐका स्वामी शांतिगिरीजी महाराजांना!
संकट प्रसंगी सर्वात मोठे आव्हान असते, मन शांत ठेवण्याचे. आणि ते सरावाने शांत ठेवता येते. मन शांत असेल, तर आपले निर्णय कधीच चुकत नाहीत. परंतु, मन जितके शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा, तेवढे ते बिथरते. त्याला आटोक्यात आणायचे तरी कसे? याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता,स्वामी शांतिगिरीजी महाराज live चर्चासत्रात आपल्या भेटीस येणार आहेत. या चर्चासत्रात ते 'मानसिक शांती मिळवण्याची साधने' आपल्या श्रोत्यांना सांगणार आहेत.
ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालायची, तर ते मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी व्यक्ती हवी. हे कार्य करत आहेत जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज. त्यांनी असंख्य व्यसनी जीवांना व्यसनमुक्त केले. संसारात भरकटलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन केले. श्रमदानाच्या माध्यमातून लोकांना श्रमभक्ती शिकविली. सत्संगाच्या माध्यमातून अनेक पदभ्रष्ट झालेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन केले.
शेतकरी संकटात सापडला तर त्याच्यासाठी पर्जन्ययाग यज्ञ करणे आणि त्याच्या मदतीला धावून जाणे हे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत करून दाखवून दिले. आज कोरोना संकटातून देशाला नव्हे तर विश्वाला मुक्ती मिळावी म्हणून दैनंदिन होम हवन, महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या मजुरांना भोजनाची व्यवस्था असेल. आज प्रत्येक आश्रमात दोन वेळचे मोफत भोजन अन्नदान सुरू आहे. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक जीवाला शांती मिळावी म्हणून सतत प्रयत्नशील राहणे. असे अनेक समाजपयोगी कार्य शांतिगिरीजी बाबा करत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वेळेस हजारो साधू संतांना, संन्यासी महाराजांना भोजन देणे, वृक्षारोपण करणे, फळ फुलांच्या झाडांची देखभाल व संरक्षण करणे. असे अनेक उपक्रम शांतिगिरीजी बाबा आश्रमच्यावतीने करत असतात.
असे सत्कार्य आपल्याही हातून घडावे, असे वाटत असेल, तर सर्वप्रथम मनाची बैठक स्थिर असणे महत्त्वाचे आहे आणि ती कशी करायची, हे शांतिगिरीजी बाबा आपल्याला लोकमत भक्ती युट्युब लाईव्ह या माध्यमातून १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता.
https://www.youtube.com/c/LokmatBhakti/featured