अध्यात्मच नव्हे, तर वास्तुशास्त्रही सांगते, रोज सायंकाळी दिवा लावावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 06:21 PM2021-02-10T18:21:50+5:302021-02-10T18:22:10+5:30
दिवा हे अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. त्यातून जिवंतपणा, कृतिशीलता, बुद्धिमत्ता, साहस या गोष्टी दिसतात. दिव्यामुळे अंधाराचे साम्राज्य नाहीसे होते
'दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना, शुभं करोति म्हणा' हे गीत आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. सायंकाळ झाली की देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावणे हा आपल्यावर झालेला संस्कार आहे. दिव्याची ज्योत देवाजवळच नाही, तर आपल्या मनातही प्रकाश पाडते. तिचे चैतन्य आपल्याला अनुभवता येते. समईच्या ठेवणाऱ्या संथ ज्योतीकडे पाहत दोन क्षण उभे राहिले, तरी मन शांत होते. वास्तुशास्त्रातही दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.
दिवा हे अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. त्यातून जिवंतपणा, कृतिशीलता, बुद्धिमत्ता, साहस या गोष्टी दिसतात. दिव्यामुळे अंधाराचे साम्राज्य नाहीसे होते. आजही संपूर्ण भारतात दिवाळीत घराघरात जास्तीत जास्त दिवे पहावयास मिळतात, लहानपणापासूनच "दिवे लावा शंभर दारी, भाग्य येईल तुमच्या घरी" असे आपण शिकत आलो आहोत या दिव्याचे निरनिराळे उपयोग आता आपण पाहूयात.
- घरामध्ये सकाळी व संध्याकाळी देवाजवळ निदान एक तास तरी दिवा लावावा त्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
- घराच्या आग्नेय दिशेला दिवा लावावा त्या मुळे घरात आजारपणे येत नाहीत (कर्पूर होम केला तर अत्युत्तम)
- रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने भाग्य उजळते.
- घरात देवाजवळ निरंतर दिवा चालू ठेवल्याने ठेवल्याने घरावर अरिष्ट येत नाहीत.
- गुलाब पाण्यातल्या वातीचा उपयोग करून दिवा लावल्यास घरात शांततेचा अनुभव होतो.
- रोज देवघरातल्या दिव्याच्या ज्योती कडे दोन मिनिटं एकटक डोळ्यातून पाणी येईपर्यंत पहावे) (यास अग्नी त्राटक म्हणतात) यामुळे आपली नजर तीक्ष्ण होऊन आत्मविश्वास वाढतो.
- देवाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावल्यास आर्थिक अडचण दूर होते (हा दिवा निरंतर असल्यास जास्त फायदा होतो).
- गाईच्या तुपाचा उपयोग करून कापूराबरोबर दिवा लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा तर जातेच शिवाय आर्थिक अडचणीही दूर होते (याचा अनुभव बऱ्याच लोकांना आहे) यात तुम्ही कापुराशिवाय, अत्तर, वाळलेली कडुलिंबाची पाने, तुळशीची पाने सुद्धा टाकू शकता.