Vastu Tips: घरात आरसा कसा आणि कुठे लावावा? टिप्स फॉलो करा अन् आर्थिक अडचणी करा दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 05:51 PM2022-01-26T17:51:52+5:302022-01-26T17:52:17+5:30

Vastu Tips: घरातील आरसा सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतो. घरात आरसा नेमका कुठे आणि कसा लावावा याच्या टिप्स जाणून घेऊयात...

Put mirror in house like this you will get rid of financial troubles | Vastu Tips: घरात आरसा कसा आणि कुठे लावावा? टिप्स फॉलो करा अन् आर्थिक अडचणी करा दूर!

Vastu Tips: घरात आरसा कसा आणि कुठे लावावा? टिप्स फॉलो करा अन् आर्थिक अडचणी करा दूर!

googlenewsNext

आयुष्यात समृद्धी आणि सकारात्मकता टीकून राहण्यासाठी तुम्ही राहात असलेल्या वास्तूचं फार मोठं योगदान यात असतं. आपलं घर आर्थिक अडचणींपासून दूर राहावं, सकारात्मक ऊर्जा राहावी आणि कोणत्याही नातेसंबंधातील वादविवाद घरापासून दूर ठेवण्यासाठी आपण अनेक वास्तू टिप्स फॉलो करतो. आयुष्यातील विविध अडचणी दूर करण्यासाठी वास्तू टिप्सची खूप मदत होते. वास्तूमधील आरसा देखील तुमच्या आयुष्यात एक महत्वाची भूमिका पार पाडत असतो. वास्तूशास्त्रात आरसा खरेदी करणं आणि तो वास्तूमध्ये नेमकं कुठे असावा, कसा असावा यासाठी याबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. 

घरात कसा लावावा आरसा?
काच किंवा काचेचे शोपीस नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर लावावेत. या दिशेला आरसा लावल्यास धनसंपत्तीशी निगडीत समस्या दूर होतात. 

स्वयंपाक घरात कधीच आरसा लावू नये. विशेषत: गॅस स्टोव्ह किंवा जेवण बनवण्याच्या जागा आरशातून प्रतिबिंबीत होत असेल अशा ठिकाणी आरसा असू नये. 

आरसा जमिनीपासून कमीतकमी चार ते पाच फूट उंचीवर असावा. जमिनीच्या दिशेनं झुकलेला नसावा. आरसा नेहमी सपाट असायला हवा. आरशाची फ्रेम धातू ऐवजी लाकडी असायला हवी. घरात स्टडी टेबल असल्यास स्टडी टेबलपासून आरसा दूर असायला हवा. कारण स्टडी टेबल जवळ आरसा असल्यास चित्त एकाग्र राहण्यास अडचण निर्माण होते. तसंच तुमच्यावरील कामाचं ओझं वाढतं. आरसा दररोज स्वच्छ करावा. जेणेकरुन आरशातून नेहमी तुमची प्रतिमा स्वच्छपणे प्रतिबिंबीत व्हायला हवी. 

तुमचा स्वत:चा व्यवसाय असेल तर कामकाजाच्या ठिकाणी कॅश लॉकरच्या समोर आरसा लावावा. आरसा धनाला आकर्षित करतो असं म्हटलं जातं आणि तुमची आर्थिक स्थिती दुपटीनं विकसीत होते. लॉकरच्या आतही आरसा ठेवता येईल. 

आरसा खरेदी करताना त्यात आपली प्रतिमा व्यवस्थित दिसत आहे की नाही याची पडताळणी करावी. आरसा स्वच्छ प्रतिमा प्रतिबिंबीत करणारा नसल्यास वास्तूदोषाला निमंत्रण ठरते. 

वास्तू नियमांनुसार आरसा दरवाजाच्या अगदी समोरच्या बाजूला असू नये. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या समस्येत भर पडते असं म्हटलं जातं. कुटुंबात काही समस्या किंवा अडचणींचा काळ सुरू असल्यास बेडरुमच्या दरवाजाच्या अगदी समोर आरसा लावू शकता. यामुळे घरातील समस्या हळूहळू दूर होऊ लागतात. 

वास्तूशास्त्रानुसार जीवनात धनसंपत्तीशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागत असेल तर घरात डायनिंग टेबलच्या समोर आरसा लावावा असं म्हटलं आहे. आरशामध्ये डायनिंग टेबल पूर्णपणे दिसेल अशा ठिकाणी आरसा लावावा. असं केल्यानं जीवनात धन-धान्याची कधीच कमतरता जाणवत नाही. 

Web Title: Put mirror in house like this you will get rid of financial troubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.